सध्या नैसर्गिक परिस्थितीमुळे शेती व्यवसाय हा फारच जिकिरीचा होऊन बसला आहे. संकटा मागून संकटांची मालिका शेतकऱ्या मागे सुरुच आहे.
हवामान बदलाचा विपरीत परिणाम होऊन शेती उत्पादनावर होत असून त्यामुळे शेतकरी अधिक चिंता ग्रस्त असताना त्यामध्ये आणखीनच भर टाकणारी बातमी समोर येत आहे. सध्या राज्यामध्ये अनेक भागात उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे चिन्ह असताना अगदीउन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाऊस पडणार असल्याची चिंतादायकशक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीच्या नुसार येणाऱ्या दोन ते तीन दिवसात मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असून राज्याच्या इतर भागात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे आणखी संकटात भर पडण्याची चिन्हे आहेत. राज्यात वादळी वाऱ्यासह तसेच विजांच्या कडकडाटाची शक्यता असून या अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे.
हरभरा, गहू तसेच ज्वारी ही पिके तसेच कांदा पिकाला या अवकाळी पावसाचाजबर फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असूनपिकांची काढणी केली असेल तर ती पिके व्यवस्थित झाकून ठेवणे गरजेचे असल्याचा आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
उत्तर भारताच्या काही राज्यात आज पावसाचा इशारा
उत्तर प्रदेश राज्याच्या काही भागांमध्ये आज पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून काही भागात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.
तसेच उत्तर भारतातील दिल्ली मध्ये देखील आज आणि उद्या जोरदार वेगाने वारे पाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून दिल्ली चे आजचे किमान तापमान 15 डिग्री तर कमाल तापमान 35 डिग्री इतके राहणार आहे.
Share your comments