कापूस पिकाचे उत्पादन बरेच शेतकरी घेत आहेत. मात्र मागच्या काही वर्षापासून कापूस पीक (cotton crop) शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत आहे. पिकाचा उत्पादन खर्च तर वाढला आहेच, यासह पाऊस आणि कीड-रोगामुळे होणारे नुकसानही वाढले आहे.
त्यामुळे कापसाला किमान १२ हजार रुपये क्विंटल हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी तेलंगणामधील शेतकऱ्यांनी केली आहे. आपल्या मागण्यांसाठी शेतकरी तीन दिवस निदर्शने करणार आहेत.
यंदा देशात कापूस लागवडी वाढली. तेलंगणातही कापसाखालील क्षेत्र वाढून २० लाख हेक्टरवर पोचले. मात्र शेतकऱ्यांना कापूस शेतीतून मिळणारा मोबदला घटला. कापूस बियाणे (Cotton seed), खते आणि कीटकनाशकांचे दर सतत वाढत आहेत. तर कापूस वेचणीसाठीची मजुरीही मोठ्या प्रमाणात वाढली.
शेतकऱ्यांनो पीक कापणीसाठी या ब्रश कटरचा करा वापर; कमी वेळेत मिळेल चांगला नफा
त्यातच पाऊस आणि नैसर्गिक आपत्तींनी होणारे नुकसान वाढले. शेतकऱ्यांना (farmers) एकरी केवळ ४ ते ५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत आहे. यावर्षी कापसाला ६ हजार ८० रुपये हमीभाव सरकारने जाहीर केला. या हमीभावातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नाही.
सरकारची खास योजना! 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांत मिळणार 2 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी
कारण शेतकऱ्यांना एक क्विंटल कापूस उत्पादनासाठी जवळपास ८ हजार रुपये खर्च यतो. म्हणजेच सध्या कापूस उत्पादकांना क्विटंलमागे २ हजार रुपयांचा तोटा होत आहे. कापूस उत्पादकांना उत्पादन खर्च निघून किमान चार पैसे मिळावे यासाठी सरकारने किमान १२ हजार रुपये हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी तेलंगणामधील शेतकऱ्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
'या' राशीच्या लोकांच्या मनातल्या इच्छा होणार पूर्ण; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी! फक्त 35 हजारांची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; वाचा वैशिष्ट्ये...
शेतकऱ्यांसाठी सागवानची शेती ठरेल फायदेशीर; काही वर्षातच शेतकरी होतील करोडपती
Share your comments