1. बातम्या

GST चा फेरा…! आजपासून पुन्हा वाढणार महागाई, दूध आणि पिठावर लागणार 5% GST, वाचा डिटेल्स

आजपासून अनेक गरजेच्या वस्तू महाग होणार आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत GST काउंसिलने GST दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. GST दर वाढल्याने दही, लस्सी, तांदूळ, मैदा यासह अनेक जीवनावश्यक वस्तू महाग (expensive) होणार आहेत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
gst increase

gst increase

GST COUNCIL MEETING:- आजपासून अनेक गरजेच्या वस्तू महाग होणार आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत GST काउंसिलने GST दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. GST दर वाढल्याने दही, लस्सी, तांदूळ, मैदा यासह अनेक जीवनावश्यक वस्तू महाग (expensive) होणार आहेत.

दुग्धजन्य पदार्थ आणि मैदा महाग होईल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या GST परिषदेच्या बैठकीत पहिल्यांदाच GST च्या कक्षेत दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

GST काउंसिलच्या बैठकीत टेट्रापैक केलेले दही, लस्सी आणि बटर मिल्कवर 5% GST लावण्याचा निर्णय घेण्यात आला. इतकेच नाही तर ब्रँड नसलेले प्री-पॅकेज केलेले आणि प्री-लेबल केलेले पीठ आणि डाळींवरही 5% GST लावला जाईल.

LED ब्लब आणि LED दिवे वर देखील 18% GST

सरकारने ब्लेड, कागदी कात्री, पेन्सिल शार्पनर, चमचे, काटे असलेले चमचे, स्किमर्स आणि केक सर्व्हिस इत्यादींवर GST वाढवला आहे. आता ह्या वस्तू वर देखील 18% दराने GST वसूल केला जाईल. एवढेच नव्हे तर LED ब्लब आणि LED दिव्यांवरील GST ही 12% वरून 18% करण्यात आला आहे.

उपचार करणे देखील महाग होणार 

रूग्णालयाकडून रु. 5000 पेक्षा जास्त प्रतिदिन खोली उपलब्ध करून दिल्यास, 5% दराने GST भरावा लागेल.  यामध्ये आयसीयू, आयसीसीयू, एनआयसीयू, रूमवर सूट लागू असेल.

हॉटेल रूमसाठी जास्त पैसे मोजावे लागतील

सध्या, 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या हॉटेलच्या खोल्यांवर GST नव्हता, परंतु आता अशा खोल्यांवर देखील 12% दराने GST लागू होईल.

बिझनेस क्लासचा प्रवास महाग होईल

आत्तापर्यंत करमुक्त असलेल्या अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा, बागडोगरा येथून निघणाऱ्या विमानांना आता फक्त इकोनॉमी क्लासवर GST आणि बिझनेस क्लासच्या प्रवासासाठी 18% दराने GST करमुक्त असेल. 

गोदामात माल ठेवणेही महाग होणार आहे

गोदामातील ड्रायफ्रूट्स, मसाले, कोपरा, गूळ, कापूस, ताग, तंबाखू, तेंदूपत्ता, चहा, कॉफी इत्यादींच्या साठवणुकीच्या सेवा, आजपर्यंत करमुक्त होते, परुंतु ते देखील आता कराच्या कक्षेत आणण्यात आले आहेत आणि अशा सेवांना आता 12% दराने आजपासून GST भरावा लागेन.

याशिवाय, कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी गोदामांमध्ये धुरीकरण करण्याच्या सेवेला करातून सूट देण्यात आली होती.  आता अशा सेवांवर 18% दराने GST लागू होईल.

वाढता GST संकलन:- जूनमध्ये ड्रायफ्रूट्स संकलन वाढून 1.45 लाख कोटी रुपये झाले. एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ही वाढ 56% आहे. तर मे महिन्यात ते 1.41 लाख कोटी रुपये होते.

English Summary: gst rate increased inflation is also increase Published on: 18 July 2022, 07:40 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters