महागाईने होरपळलेल्या नागरिकांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. मागील काही दिवसांत विविध वस्तूंच्या किंमती सतत वाढत आहेत. त्यात आता कपड्यांच्या किंमती वाढणार आहेत
मोदी सरकार व 'जीएसटी' परिषद, यांनी उद्योगावरील जीएसटी पाठवीण्याचा निर्णय घेतला आहे. न्यानुसार आता कपड्यांवर 5 टक्के ऐवजी 12 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे जानेवारी 2022 पासून कपड्याच्या किंमती वाढण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, टेक्सटाईल क्षेत्रातील उद्योजकांकडुन कपड्यांबर 'जीएसटी' वाढ करण्यास विरोध दर्शवीला आहे. केंद्र सरकार ने थेट 5 टक्क्यांवरून 12 टक्के जीएसटी न करता तो 8 टक्क्यांपर्यंत वाढवावा, अशी मागणी केली आहे.
महसुल घटण्याची शक्यता!
महसूल वाठीसाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय, मात्र जिएसटी वाढल्याने टॅक्य चोरी वाढेल महसुलात घट होण्याची शक्यता आहे, कपड्यावरील जीएसटी वाढविल्याने जनतेला महागाईचा सामना करावा लागणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कपडे बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमती आधीच वाढल्या आहेत, त्यामुळे कपड्याच्या किंमतीत आधीच 20 ते 30 टक्क्यानी वाढ झाली आहे. त्यात जीएसटी वाढवल्याने कपड्याच्या किमती आणखी वाढतील त्यामुळे कापडं व्यापाऱ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
Share your comments