कोरोना च्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता कमी होत असताना त्याचा परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर ही दिसत आहे. देशातील प्रमुख ट्रॅक्टर कंपन्यानी मागच्या वर्षीच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यात जास्त ट्रॅक्टर विकले आहेत.
स्थानिक लोक डाऊन आणि असलेले प्रतिबंधक कमी झाल्यामुळे ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ट्रॅक्टर विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. या बाबतीतली माहितीही इंडिया रेटिंग अंड रिसर्च ने याबाबतीतला दिलेल्या अहवालात ट्रॅक्टर विक्री वाढवण्याची माहिती दिली आहे.
भारताच्या ट्रॅक्टर इंडस्ट्री ने करुणा च्या पहिल्या लाटेत असलेल्या लॉक डाऊन आणि असलेली निर्बंध तरीही आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 27 टक्के जास्त ट्रॅक्टर विकून रेकॉर्ड प्रस्थापित केले होते. या आर्थिक वर्षात कोरोना च्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यानही ट्रॅक्टर विक्रीत तीन ते सहा टक्क्यांनी वाढ होईल अशी आशा आहे.
इंडिया रेटिंग अँड रिसर्चने गुरुवारी याबद्दलची माहिती दिली. रेटिंग एजन्सीने याबाबतीत म्हटले की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ट्रॅक्टर विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये म्हटले आहे की यावर्षी चांगल्या पावसाचा अनुमान, चांगल्या पद्धतीची खरीप पिकांची स्थिती तसेच ग्रामीण उत्पन्नात झालेली वाढ या कारणांमुळे ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल.
या बाबतीत इंडिया रेटिंग एजन्सीने म्हटले की, कोरोना ची पहिली लाट ही मुख्यता शहरी भागांमध्ये होती. परंतु दुसरे लाटे ग्रामीण भारतात मोठ्या प्रमाणात आणि गंभीर स्थितीत होती. जर ट्रॅक्टर विक्रीचा विचार केला तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात या पाच राज्यांमध्ये जवळजवळ भारतातील 56% ट्रॅक्टर विकले जातात.
या पाच राज्यांमध्ये जवळजवळ कोरोनाचे 34% प्रकरण होते. तसेच दुसऱ्या लाटेतचाळीस ते पंचाहत्तर टक्के हे ग्रामीण भागातील जिल्ह्यांमध्ये नोंदवले गेलेत. इंडिया रिसर्च एजन्सीच्या नुसार केंद्र सरकार कडून कृषी क्षेत्रात सुधारना आणण्यासाठी खतांवरील सबसिडी, रब्बी पिकांसाठी एम एस पी त्याची पावले उचलली जात आहेत तसेच आर्थिक वर्ष 2020 आणि 21 मध्ये शक्ती उत्पन्नाची मोठ्या प्रमाणात झालेली खरेदीचा समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात रोकड पैसा आहे आणि त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकतात एवढे ते सक्षम आहेत.
Share your comments