1. बातम्या

ऐन सणासुदीच्या काळात चणाडाळीच्या भावाचा उच्चांक

chana daal rate growth

chana daal rate growth

ऐन सणासुदीच्या हंगामात कच्चा चना, चना डाळ,बेसन तसेच भाजलेली डाळीचे भाव उच्चांकी वाढले आहेत.ऐन सणासुदीच्या हंगामात कच्चा चना, चना डाळ,बेसन तसेच भाजलेली डाळीचे भाव उच्चांकी वाढले आहेत.

 यामागील प्रमुख कारण म्हणजे मागणीच्या तुलनेत परराज्यातून होणारी चण्याचे आवक फारच अल्प प्रमाणात होत असल्यामुळे तसेच वायदे बाजारात चनाडाळीचे सौदे करण्यास बंदी घातल्यामुळे चना डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत.घाऊक बाजाराचा विचार केला तर क्विंटल मागे चणा डाळी चारशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे.

तसेच किरकोळ बाजारात प्रति किलोमागे आठ ते दहा रुपयांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.सध्या सणासुदीचे दिवस तोंडावर असल्याने चणाडाळ, बेसन तसेच भाजक्या डाळीला मागणी अधिक राहणार असल्याचे माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

कच्चा चण्याची आवक ही प्रामुख्याने कर्नाटक,गुजरात तसेच मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात होते. या कच्चा चण्या पासून चणा डाळ आणि बेसन तयार केले जाते व याला वर्षभर मागणी मोठ्या प्रमाणात असते.

तसंच आता गणेश उत्सव, नवरात्र उत्सव महत्वाचे म्हणजे दिवाळी हे सण  अगदी तोंडावर आहेत.याकाळात चणाडाळ, बेसन आणि भाजलेल्या डाळी ला मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे.

 वायदे बाजारात बाजरी, सोयाबीन, पाम तेल, धने,हळद इत्यादी अन्नधान्याचा सौदा होतो मात्र यासौद्यातून कच्चा चण्याचे सौदे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे  पन्नास किलोच्या कट्ट्याच्या दरात वाढ झाली आहे, असे पुणे मार्केट यार्डातील चणाडाळ व्यापारी सुमित गुंदेचा यांनी म्हटले आहे.

 

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters