1. बातम्या

जास्त दूध देणाऱ्या म्हशीच्या जाती खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपये देईल सहकारी संघ

महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त विकला जाणारा दूध ब्रँड म्हणजेच गोकुळ हा आहे. या ब्रँडचा मालकी हक्क ठेवणारे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांनी शनिवारी दूध खरेदी किंमत तसेच काही क्षेत्रांमध्ये विक्री मूल्य वाढविण्याची घोषणा केली.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
kolhapur jilha dudh sangh

kolhapur jilha dudh sangh

 महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त विकला जाणारा दूध ब्रँड म्हणजेच गोकुळ हा आहे. या ब्रँडचा मालकी हक्क ठेवणारे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांनी शनिवारी दूध खरेदी किंमत तसेच काही क्षेत्रांमध्ये विक्री मूल्य वाढविण्याची घोषणा केली.

किमतीत करण्यात आलेली ही वाढ रविवार पासून लागू होईल. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटीलयांनी ही घोषणा केली.पुढे त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना जास्त दूध देणाऱ्याजातीच्या म्हशी खरेदी करता याव्यात यासाठी एक हजार कोटी रुपयांची वित्तीय सहायता दिली जाईल.

सतेज पाटील यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या निवडणुकीवेळी आम्ही जे वचन दिले होते त्यानुसार म्हशीच्या दुधाच्या खरेदी किमतीत दोन रुपये आणि गाईच्या दुधाच्या खरेदी किमतीत एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

 पुढे ते म्हणाले की  हमे राज्यात दररोज बारा लाख लिटर दूध जमा करतो त्यादृष्टीने या निर्णयाचा फायदा भरपूर शेतकऱ्यांना होईल. कोल्हापूर, सांगली आणि कोकण विभाग सोडून दुधाच्या विक्री मूल्यात वाढ केली जाईल.

 प्रत्येक वर्षी होईल दूध कलेक्शन मध्ये दोन लाख लिटर ची वाढ

 सतेज पाटील यांनी सांगितले की या लक्ष्याला पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्षीदूध कलेक्शनमध्ये दोन लाख लिटरची वाढ करण्यात येईल. तसेच त्यांनी सांगितले की निवडणुकीनंतर उदयास आलेल्या नवीन बोर्ड द्वारे दिलेल्या निर्णयांमध्ये महाराष्ट्राची दूध वितरण एजन्सी महानंद सोबत मुंबईत दूध विक्रीसाठी एक एम ओ यु वर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यामुळे दुधाचा पॅकिंग खर्च कमी होईल आणि प्रत्येक वर्षी 18.80 लाख रुपयांची बचत होईल. सगळे मिळून विविध बाबींवर होणारा खर्च कमी करून वर्षाला तेरा कोटी रुपये बचत होऊ शकते. 

पुढे सतीश पाटील यांनी सांगितले की गोकुळ ते स्थानिक पातळीवर गरज पूर्ण करण्यासाठी एक ऊर्जा संयंत्र स्थापन केले आहे. जे ऊर्जा संयंत्र 25 जुलैपासून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन सुरू करेल. तसेचपुढे त्यांनी म्हटले की शेतकऱ्यांना अधिक दूध देणाऱ्या मुऱ्हा, जाफराबादी या आणि पंढरपुरी जातीच्या म्हशीची खरेदी करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे आर्थिक मदत केली जाईल.

English Summary: growth in milk price by kalhapur jilha dudh sangh Published on: 11 July 2021, 04:01 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters