1. बातम्या

Goverment Announcement: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींना मिळणाऱ्या मदतीत 'इतकी'वाढ

बरेचदा आपल्याला माहिती आहे की, बऱ्याच वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांवर तसेच इतर व्यक्तींवर देखील जीव गमावण्याची वेळ येते. बऱ्याचदा अशा घटनांमध्ये कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते. त्यामुळे आधीच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 15 लाख रुपयांचे अर्थसहाय्य अगोदर देण्यात होते

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
sudhir mungantivaar

sudhir mungantivaar

बरेचदा आपल्याला माहिती आहे की, बऱ्याच वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांवर तसेच इतर व्यक्तींवर  देखील जीव गमावण्याची वेळ येते. बऱ्याचदा अशा घटनांमध्ये कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते. त्यामुळे आधीच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 15 लाख रुपयांचे अर्थसहाय्य अगोदर देण्यात होते

परंतु आता त्यामध्ये पाच लाख रुपयांची वाढ करून ही रक्कम वीस लाख रुपये करण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत जाहीर केला. तसेच याबाबतचा शासन निर्णय देखील 23 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला आहे.

नक्की वाचा:'CM Eknath Shinde: शेतकरी भावांनो, तुमचा जीव झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही, मी कासावीस होतो'

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्या व्यक्तीवर  अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांना वाघ, बिबट्या, रानडुक्कर, अस्वल, हत्ती, कोल्हा यांच्या हल्ल्यात होणाऱ्या मनुष्याने मुळे देण्यात येणारे अर्थसहाय्य या रकमेत वाढ करण्यात आली आहे.

या देण्यात येणार्‍या 20 लाख रुपयांच्या अर्थसहाय्य यापैकी दहा लाख रुपये हे देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ चेकच्या माध्यमातून व उरलेली रक्कम दहा लाख रुपये ही त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव रक्कम भारतात एवढी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास...

एवढेच नाही तर यामध्ये व्यक्ती कायम अपंग झाल्यास पाच लाख तर गंभीर रित्या जखमी झाल्यास एक लाख पंचवीस हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

तसेच यामध्ये व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषध उपचारासाठी येणारा खर्च देण्यात येणार असून खाजगी रुग्णालयात उपचार करणे अगत्याचे असल्यास त्याचे मर्यादा  वीस हजार रुपये प्रति व्यक्ती इतकी राहणार आहे.

नक्की वाचा:शिवार ते ग्राहक शेतीमाल विक्रीसाठी राजू शेट्टी आग्रही, मोदी सरकारकडे केली मोठी मागणी

English Summary: growth in compansation package in person dead in wild animal attack Published on: 25 August 2022, 09:44 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters