धान खरेदीसाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवून धान खरेदी वेळेवर करा तसेच धान खरेदी व धान भरडाई प्रक्रियेबाबतअंदाजीत वेळापत्रक तयार करून त्यानुसार आवश्यक प्रक्रिया पार कशा पडतील याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
पुढे बोलताना श्री. भुजबळ म्हणाले की, यासाठी राज्यस्तरीय भरारी पथक तयार करण्यात येणार आहे व या पथकांकडून धानाची प्रतवारी व इतर संबंधित आवश्यक बाबींसाठीप्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन सर्व बाबींची तपासणी केली जाईल. या तपासणी दरम्यान काही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.पुढे बोलताना ते म्हणाले की धान खरेदी केंद्र बाबतीत स्थानिक यंत्रणांनीएकमेकांच्या समन्वयाने काम करावे.
धान खरेदी केंद्रावर आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजेच ग्रेडर,वजन काटे, मोईश्चर मीटर, साठवणुकी साठी लागणारी गोदामे या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत की नाही याची तपासणी करावी तसेच ज्या शेतकऱ्यांनी धाम खरेदीसाठी नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्यात यावे. धान खरेदी केंद्र बाबत शासन स्तरावर एक मध्यवर्ती माहिती संकलन कार्यालय करता येईल का? जेणेकरून त्या माध्यमातून अन्न खरेदी केंद्राचे योग्य व्यवस्थापन करता येईल, याचीही चाचपणी संबंधित यंत्रणांनी करावी. तसेच धान्य खरेदी केंद्रावर प्रशिक्षित ग्रेडर ची नेमणूक करावी व सर्व गोदामांची योग्य व्यवस्थापन करण्यात यावे तसेच कोणत्याही शेतकरी धान्य खरेदी नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी दिल्या.
तसेच पुढे बोलताना त्यांनी सूचना केल्या की पण हंगाम 2020-21साठी ज्वारी, बाजरी,गहू, मक्का इत्यादी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र व येणाऱ्या अंदाजित उत्पादनाबाबत योग्य माहिती घेण्यात यावी जेणेकरून केंद्र शासनास प भरड धान्याच्या बाबतीतली माहिती कळविण्यात येईल.भरड धान्याची असलेली प्रत व गुणवत्ता तपासून खरेदी करणे बाबतच्या सूचना त्यांनी दिल्या. ते भरड धान्य खरेदी पूर्व नियोजनाची मंत्रालयातील परिषद सभागृहात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला व्हीसी द्वारे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, या विभागाचे सचिव विजय वाघमारे तसेच सर्व विभागांचे पुरवठा उपायुक्त व जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.
Share your comments