केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने संपूर्ण देशासाठीचा २०२२ चा भूजल स्रोत मूल्यांकन अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार राज्यातील २७२ जलस्रोत सुरक्षित आहेत तर ८० तालुक्यांत ते मध्यम ते अति या प्रमाणात शोषित आहेत. या ठिकाणची भूजल पातळी धोक्याच्या सीमेकडे जात आहे. शोषित पाणलोट भागातील भूजल पातळी सुधारण्याकरिता राज्यातील १३३९ गावांत अटल भूजल योजनेअंतर्गत संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे,
या योजनेसाठी शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अटल भूजल योजना जागतिक बँकेच्या साह्याने राबविण्यात येत आहे. केंद्र शासन ५० % निधी आणि उर्वरित ५० % निधी जागतिक बँक अनुदान आणि प्रोत्साहन स्वरूपात दिला जाणार आहे. पण आज हे सर्व करण्याची वेळ का आली आहे? राज्यातील ८० तालुक्यांतील घटत्या भूजल पातळीने कदाचित आपल्याला भविष्यातील धोक्याची जाणीव करून दिली आहे.
अटल भूजल योजना शाश्वत भूजल व्यवस्थापनाचे लक्ष्य ठेवून कार्यान्वित करण्यात आली आहे. भूजल कमी होण्याच्या सतत वाढत चाललेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी, भारत सरकारने २०१८ मध्ये जागतिक बँकेकडून आर्थिक मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये अटल भूजल योजना सुरू केली होती.
शेतकऱ्यांनो उसावर खोडकिडीचा प्रादुर्भाव कसा घालवायचा, जाणून घ्या..
लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक आराखडा बळकट करण्याच्या मुख्य उद्देशाने ही योजना पथदर्शी म्हणून तयार करण्यात आली आहे. ही योजना जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत आहे. भूजलाने मानवाला नेहमीच आधार दिला आहे. कारण सर्व ठिकाणी भूपृष्ठीय पाणी उपलब्ध असेलच असे नाही. आड, विहीर, बारव, कुंड यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होते, सोबत विहिरीच्या आधारे फळे, फुले, वेली, भाज्या अशी बागायती शेतीही फुलली आहे.
पण भूजल हे पिण्यासाठी आणि सिंचनासाठी आधार असल्याने लोकांनी त्याचे अपार शोषण केले आणि अनेक पाणलोट क्षेत्र समृद्ध पासून ते शोषित श्रेणीत जाऊ लागले आहेत. भूजल साठवण ही भूस्तराखाली होणारी आणि क्रमाक्रमाने होत जाणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
भूस्तराखाली सर्वत्रच भूजल सापडेल याची खात्री देता येत नाही. एकेठिकाणी साठलेले भूजल जेव्हा प्राप्त होते तेव्हा ते त्या ठिकाणी भूस्तरातील सच्छिद्र भागातून प्राप्त होत असते. आतापर्यंत जेवढे भूजल आपण उपसले आणि वापरले आहे ते सर्व नैसर्गिक प्रक्रियेतून प्राप्त झाले आहे.
शेतकऱ्यांनो गहू कीड नियंत्रण माहिती
भूजल उपसा कमी करण्यासाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता आणि पुरवठा याचा ताळमेळ साधला पाहिजे. शिवारातील पाणी शिवारात ही संकल्पना ग्रामीण भागात तळागाळात रुजली पाहिजे. जागेच्या उपलब्धतेनुसार शेततळे किंवा शेतकुंड खोदणे आणि त्यात पावसाचे पाणी साठवणे हे करायला हवे.
तसेच छतावरील पाऊस पाणी संकलन आणि जमिनीखालील टाकीत साठवणे हे सुद्धा केले तर ते लाभाचेच ठरणार आहे. पावसाचे पाणी वाहून जाताना ते शेतातील मातीचा वरचा थर वाहून नेते. पावसाचे पाणी शेतात थांबणे, मुरणे, जिरणे आवश्यक आहे ते यासाठी आणि भूजलाच्या पुनर्भरणासाठी.
दुबईमध्ये 17 व्या आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन, कृषी जागरणचाही सहभाग
शोषणामुळे भूजल पातळी खालावलेल्या गावांमध्ये अटल भूजल योजना सध्या राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे अनेक गावांना जलसंजीवनी मिळणार आहे. भूजल हा नैसर्गिक खजिना आहे. तो जपून वापरला आणि पुनर्भरणाद्वारे जोपासला तरच तो कायम टिकून राहील, हे ग्रामस्थांना पटवून देणे, जल अंदाजपत्रक मांडणे, संधारण आणि संवर्धनाचे प्रशिक्षण देणे, जाणीवजागृती घडवून आणणे हे सर्व अटल भूजल योजनेत होणे गरजेचे आहे.
पिण्याच्या बंद नळपाणी पुरवठा योजनेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असते. पण अटल भूजल योजनेत खर्चाचा आणि तत्सम पूर्णतांचा भाग नाही. अटल भूजल योजनेत शाश्वत भूजल स्त्रोतांसाठी साक्षरता वाढवणे आणि प्रशिक्षण घेणे अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो हा लेख तुमच्यासाठी! उत्पादन वाढतेय उत्पन्नवाढीचे काय? शेतकरी जातोय तोट्यात
शेतकऱ्यांनो सुधारित पद्धतीने वराहपालनास संधी
उस्मानाबादच्या कृषी प्रदर्शनात धेनू ॲप ठरले पशुपालकांचे प्रमुख आकर्षण, शेतकऱ्यांना होतोय फायदा..
Share your comments