निसर्गाच्या लहरीपणामुळे घटलेले सोयाबीन चे उत्पादन तर बाजारात वाढलेली सोयाबीन ला मागणी आणि आता रशिया व युक्रेनमध्ये युद्ध चालू असल्यामुळे जी परिस्थिती ओढवलेली आहे त्यामुळे अगदी शेवटच्या टप्यात सोयाबीन ला चांगले दिवस आले आहेत. मागील १५ दिवसांमध्ये सोयाबीन च्या दरात असे काय झाले की शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा सुद्धा विश्वास बसत न्हवता. दिवसेंदिवस सोयाबीन च्या दरामध्ये वाढच होत निघाली. मंगळवारी लातूर मधील प्रक्रिया उद्योजकांनी सोयाबीन ची सुमारे ७ हजार ७०० क्विंटल एवढी खरेदी केली आहे. रशिया, युक्रेन तसेच अर्जेंटिना मधून जे सूर्यफूल तेलाची आयात बंद झाली असल्यामुळे देशांतर्गत सोयाबीन ची मागणी वाढलेली आहे त्यामुळे सोयाबीन च्या दरात ही वाढ झालेली आहे. भविष्यात सोयाबीनचे दर वाढणार की घटणार असा संभ्रम शेतकऱ्यांना आहे.
उत्पादन घटले मात्र, वाढीव दराने शेतकऱ्यांना तारले :-
खरीप हंगामातील सोयाबीन ची जोमात वाढ सुरू होती. दरम्यान अतिवृष्टी तसेच सतत पाऊस लागून राहिल्यामुळे सोयाबीन चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन हे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते मात्र पावसामुळे सोयाबीन चे एवढे नुकसान झाले होते तसेच हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन ला दर ही मिळाला नाही. जो पर्यंत सोयाबीन ला वाढीव दर मिळत नाही तो पर्यंत सोयाबीन विकायचे नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. आजच्या स्थितीला सोयाबीन ला विक्रमी दर मिळत आहे.
आता पर्याय सोयाबीनचाच :-
सध्या युक्रेन - रशिया देशांमध्ये युद्ध सुरू आहे जे की याचा परिणाम सोयाबीन वर होत आहे. रशिया, युक्रेन तसेच अर्जेंटिना मधून भारतात सूर्यफूल तेलाची आयात होते मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे आयात बंद झाली आहे जे की आता तेल प्रक्रिया उद्योजकांना सोयाबीन शिवाय पर्याय च राहिला नाही. देशांतर्गत यामुळे सोयाबीन च्या मागणीत वाढ झालेली आहे. सोयाबीन च्या अंतिम टप्यात सोयाबीन उत्पादकांना चांगला फायदा होत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट दर, निर्णय शेतकऱ्यांचा :-
सोयाबीन अंतिम टप्यात असताना दरात वाढ झालेली आहे. मागील वर्षीच्या सोयाबीन च्या दरापेक्षा यंदाच्या वर्षी सोयाबीन च्या दरामध्ये दुप्पट वाढ झालेली आहे. सध्या रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने याचा परिणाम भविष्यात सोयाबीन वर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सोयाबीन ला प्रति क्विंटल ७ हजार ७०० रुपये दर मिळत आहेत त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
Share your comments