1. बातम्या

हायड्रोजेल तंत्रामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दुष्काळी भागात ठरतंय हे तंत्र फायदेशीर, जाणून घ्या काय आहे हायड्रोजेल

काळाच्या बदलानुसार शेतीपद्धतीमध्ये ही अमूलाग्र बदल होत आहे मात्र सिंचन व्यवस्थेला चांगले च महत्व प्राप्त झाले आहे. सिंचन व्यवस्थेमुळे पीक उत्पादनात वाढ होत आहे तसेच शेतीची प्रगती सुद्धा होत आहे. जरी उत्पादनात वाढ होत असली तरी अजून सुद्धा पूर्णपणे सिंचनव्यवस्था सुधारलेली नाही. पिकांना जर वेळेवर पाणी मिळाले नाही तर पिकांचे नुकसान हे ठरलेले असते. कृषी शास्त्रज्ञानी शेतीला पाणी देण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. हायड्रोजेल हे एक नवीन तंत्रज्ञान आहे जे की एकदा की शेतात टाकले की कोरडवाहू शेतात सुद्धा काही अडचण येत नाही तसेच या तंत्राचा पिकावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. हायड्रोजेल या तंत्रणेमुळे पिकांच्या उत्पादनात तर वाढ होणार आहेत पण सोबतच शेतकऱ्यांचे जे नुकसान होत चालले आहे ते सुद्धा टळणार आहे. झारखंड राज्यातील रांची मधील येथील इंडियन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रेझिन अँड ग्लू या ठिकाणी हायड्रोजेल हे यंत्र विकसित केले गेले आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
hydrogel

हायड्रोजेल तंत्रज्ञान म्हणजे काय?

गवारपासून बनवले जाणारे जे गोंद असते त्या गोंदमध्ये पाणी साचवून ठेवण्याची मोठ्या प्रमाणात क्षमता असते. गोंद पासून जी पावडर तयार केली जाते ती हायड्रोजेल या तंत्रासाठी वापरली जाते. ज्यावेळी तुम्ही हे तंत्र शेतात टाकता त्यानंतर जवळपास एक वर्ष ते शेतात राहते. एक वर्षानंतर मात्र त्याची पाणी साचवून ठेवण्याची क्षमता कमी कमी येते. हळूहळू हायड्रोजेल जमिनीत मुरते मात्र एकदा की पाऊस पडला की हायड्रोजेल मध्ये असणारी जी गोंद पावडर आहे ती पाणी शोषून घेते. नंतर पाऊस संपला की गोंद मध्ये असणारा ओलावा सिंचन करण्यासाठी उपयोगी पडते. त्यामधील ओलावा संपला की ते यंत्र पुन्हा सुकते आणि नंतर पाऊस पडला की नंतर ओलावा तयार होतो.

असा करा तंत्रज्ञानाचा वापर :-

हायड्रोजेल हे तंत्र शेतात वापरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आधी आपल्या शेताची नांगरणी करून घेतली पाहिजे. प्रति एकर १ ते ४ किलो हायड्रोजेल शेतीमध्ये पसरावे. त्यानंतर तुम्ही शेतात पीक लावले तरी चालेल. जरी बागायती शेती असेल तर वनस्पतीच्या मुळाजवळ खड्डा काढावा आणि तिथे हायड्रोजेल टाकावे. दुष्काळात पाणी शोषून आर्द्रता सोडण्याचे काम हायड्रोजेल हे यंत्र करत असते.

हायड्रोजेलची बियाणे ऑनलाइन तसेच दुकानांमध्ये आहेत उपलब्ध :-

हायड्रोजेल ची बियाणे दुकानांमध्ये उपलब्ध आहेत किंवा ऑनलाइन सुद्धा तुम्ही मागवू शकता. आयआयएनआरजीचे शास्त्रज्ञ डॉ. नंदकिशोर ठोंबरे यांचे असे म्हणने आहे की दुष्काळी भागामध्ये हायड्रोजेल चा शेतकऱ्यांना खूप फायदा आहे. यामुळे शेती पिकाच्या उत्पादनात वाढ ही होते आणि शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा भेटेल.

English Summary: Great relief to farmers due to hydrogel system! This technique is beneficial in drought prone areas, find out what is hydrogel Published on: 12 March 2022, 05:55 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters