यावर्षी अतिवृष्टीने सगळ्या महाराष्ट्रात हाहाकार माजवला. शेतकऱ्यांच्या दुःखाला तर पारावार उरला नाही. मोठ्या कष्टाने उभा केलेला खरीप हंगाम अक्षरशः डोळ्यादेखत पाण्यात गेला.
या संकटात मधुर शेतकरी राजा सावरत नाही तोच गेल्या आठवडाभरापासून राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि काही भागात पाऊस कोसळत असल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटाच्या खाईत लोटला जाण्याची चिन्हे आहेत. या वातावरणाचा सर्वात वाईट परिणाम हा द्राक्षबागांवर होत आहे. कारण सध्या द्राक्षबाग हे फुलोरा मध्ये असून असल्यास ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांवर मोठा परिणाम होऊन नुकसान होत आहे. यामधून कोट्यवधीचे नुकसान होण्याची शक्यता आहेत.
महाराष्ट्राचा विचार केला तरमहाराष्ट्रामध्ये नाशिक आणि द्राक्ष यांना द्राक्ष पंढरी म्हणून ओळखले जाते. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्याचा थेट परिणाम द्राक्षबागांवर होत असून डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.त्यामुळे कराना फवारणी करावी लागत असून फवारणीचा खर्च वाढत आहे. तसेच डाउणी सोबतच घड कुज आणि द्राक्षमणी गळण्याचे प्रमाण वाढले आहे. या नुकसानीचे सर्वाधिक परिणाम सांगली जिल्ह्यात दिसत आहेत.
दर वर्षी ही परिस्थिती उद्भवत असल्याने द्राक्ष बागायतदार निसर्गाच्या या लहरीपणामुळे चिंतेत आहे. कधी अतिवृष्टीच्या सावट, कधी गारपीट कधी पडणारा अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. द्राक्षाच्या बागेमध्ये फुलोरा अवस्थेत पाणी साचले तरघड पूर्णपणे कुजतो आणि द्राक्षमणी गळतात. त्यामुळे वर्षभर केलेले काबाडकष्ट,निविष्ठा साठी झालेला खर्च वाया जातो.
Share your comments