बोगस खते व औषधे तयार करून ते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे काम सध्या सुरू आहे असे दिसते. मागे काही दिवसांपूर्वी माढा तालुक्यामध्ये बोगस औषधाची फवारणी केल्यामुळे द्राक्षबागा जळाल्याचा प्रकार घडला होता.
हा प्रकार ताजा असतानाच असाच प्रकार पंढरपूर तालुक्यात देखील घडला आहे.बोगस रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केल्यामुळे 20 एकर क्षेत्रावर असलेले द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की पंढरपूर तालुक्यातील कासेगाव वतनाळी या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा जळू लागल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अशा अप्रमाणित औषधांची विक्री करणाऱ्या कंपनी आणि स्थानिक विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या सोलापूर विभागाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
या परिसरातील शेतकऱ्यांनी मुंबई येथील एमको पेस्टिसाइड या रासायनिक कीटकनाशक निर्मिती करणाऱ्या कंपनीचे पायरी बन नावाच्या औषधाची फवारणी केल्यानंतर द्राक्षांची फळांवर आणि झाडावर त्याचा विपरीत परिणाम दिसू लागला आहे. फवारणी केल्यानंतर दहा दिवसांनी द्राक्ष घड आणि झाडे वाळुलागल्याचे समोर आले आहे. मिलीबग रोगाला प्रतिबंध म्हणून या पायरी बनऔषधाची फवारणी झाडांना दिली होती. यामध्ये सुनील गवळी नावाच्या शेतकऱ्याचे जवळ-जवळ पाच एकर सुपर सोनाका द्राक्ष बाग जळून गेली आहे. त्यामध्ये जवळजवळ संबंधित शेतकऱ्यांचे 70 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.गेल्या काही दिवसापासून या परिसरात बोगस खते आणि आणि कीटकनाशके शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे प्रकार वाढले असून यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे
यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अशा कीटकनाशकांची विक्री बिनबोभाट या परिसरात सुरु आहे. अशा बोगस खत तयार करणाऱ्या कंपन्यांवर आणि विक्री करणाऱ्या ठगांवर कृषी विभागाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
Share your comments