निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षे उत्पादकांचे खूपच नुकसान झाले आहे. जे की द्राक्ष हंगामाची सुरुवात झाल्यापासून अतिवृष्टी तसेच ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्षच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. या संकटावर मात करण्यासाठी द्राक्षे उत्पादकांनी प्रति करत हजारो रुपये खर्च केले होते मात्र ज्यावेळी द्राक्षे तोडणी सुरू झाली त्यावेळी द्राक्षाचे घड ना घड माढा तालुक्यातील बावी परिसरात गळून पडले आहेत. द्राक्षे उत्पादकांनी द्राक्षाचे उत्पादन चांगल्या प्रकारे वाढावे म्हणून ग्रीन गोल्ड या रासायनिक खताचा वापर केला होता. द्राक्षावर ज्यावेळी या रासायनिक खताची फवारणी केली त्यानंतर द्राक्षे जळू लागली. या रासायनिक खतांची ज्यावेळी प्रयोग शाळेत तपासणी केली त्यावेळी असे समजले की ही खते बोगस आहेत. या बोगस खतांमुळे बावी परिसरातील सुमारे ४०० ते ५०० टन द्राक्षाचे नुकसान झाले आहे जे की सुमारे दोन कोटी रुपयांचा शेतकऱ्याना अर्थील फटका बसला आहे. खत कंपणी तसेच खत दुकानदारावर कारवाई व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
कृषी केंद्राविरोधात शेतकऱ्यांची तक्रार :-
बावी परिसरातील द्राक्षे उत्पादक शेतकरी विजय मोरे, गणेश शिंदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या बागेतील द्राक्षाला तोडणी आली असताना द्राक्षे फुगवण्यासाठी शेतकरी मोंडनिब मधील एका कृषी केंद्रात गेले आणि तेथून ग्रीन गोल्ड या कंपनीची वेगवेगळी रासायनिक खते आणून द्राक्षेच्या बागेसाठी वापरली. या रासायनिक खतांची शेतकऱ्यांनी फवारणी तर केलीच पण द्राक्षे काढणी दरम्यान शेतकऱ्यांच्या लक्षात असे आले की द्राक्षे जळू लागली आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी लगेच कृषी विभागाशी संपर्क साधला आणि याबाबत तक्रार नोंदवली. ज्या कृषी केंद्रातून खते घेतली होती त्या ठिकाणाहून खतांचे नमुने आणले आणि पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेमध्ये तपासणीस दिले. ज्यावेळी या नमुन्यांची तपासणी झाली तेव्हा अशी बाब समोर आली की या खतांमध्ये जवळपास ७० टक्के अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी च आहे.
दीड एकरातील 12 लाखाचे नुकसान :-
पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत जे नमुने तपासण्यात आले होते त्यामधून समजले की या रासायनिक खतांमध्ये घातक पदार्थ आहेत. बावी परिसरातील विजय मोरे या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने त्याच्या दीड एकर क्षेत्रासाठी गोल्ड ग्रीन नावाचे खत वापरले होते जे की खतामुळे पूर्ण दीड एकर क्षेत्राचे नुकसान झाले. विजय मोरे याना दीड एकर मधून जवळपास १२ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते तर गणेश शिंदे या शेतकऱ्यास जवळपास ७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
20 शेतकऱ्यांचे नुकसान :-
बावी परिसरातील जवळपास २० द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांनी मोडनिंब येथे जाऊन कृषी केंद्रातून हे रासायनिक खत खरेदी केले. द्राक्षचे उत्पादन वाढावे म्हणून शेतकऱ्यांनी या खताचा डोस दिला असे शेतकरी सांगतात. मात्र या रासायनिक खतामुळे उत्पादन तर वाढले नाहीच पण ज्याची लागवड केली होती ते सुद्धा पदरी पडले नाही. शासकीय प्रयोगशाळेत जाऊन ज्यावेळी या खताची तपासणी केली त्यावेळी समजले की या खतांमुळे च द्राक्षचे नुकसान झाले आहे.
Share your comments