1. बातम्या

2017 मधील प्रकरण! द्राक्ष व्यापाऱ्याने केली होती अठरा लाखांची फसवणूक, न्यायालयाने सुनावली दोन वर्ष कारावासाची शिक्षा

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणुकीचे प्रकार दरवर्षी घडत असतात. असे फसवणूक करणारे व्यापारी अगोदर खूप चांगला व्यवहार शेतकऱ्यांसोबत करतात आणि त्यानंतर विश्वास संपादन केल्यानंतर शेतमाल घेऊन पोबारा करतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
grape farmers decesive by treders so session court punish to treders

grape farmers decesive by treders so session court punish to treders

 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणुकीचे प्रकार दरवर्षी घडत असतात. असे फसवणूक करणारे व्यापारी अगोदर  खूप चांगला व्यवहार शेतकऱ्यांसोबत करतात आणि त्यानंतर विश्वास संपादन केल्यानंतर शेतमाल घेऊन पोबारा करतात.

 हे बाब द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत नेहमीच घडत असते. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील पिंपळणारे येथे घडली होती. खेडगाव (ता.दिंडोरी )येथील व्यापारी तुषार भास्करराव दवंगे या 17 लाख 91 हजार चारशे रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चांदवड न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश एन. ए. इंगळे यांनी दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याबद्दल सविस्तर वृत्त असे की चांदवड तालुक्यातील पिंपळनेर येथील शेतकरी बाळासाहेब देवराम कोठुडे यांनी 2017 मध्ये वनी येथील व्यापारी तुषार दवंगे यांच्या तुषार व्हेजिटेबल कंपनीला 4350 प्रतिक्विंटल या दराने द्राक्ष विक्री केले होते. या बदल्यात त्यांनी पिंपळगाव येथील बँकेचे तीन चेक कोठुळे  यांना दिले होते. परंतु दिलेल्या तारखेस द्राक्ष उत्पादक बाळासाहेब कोठुळे यांनीबँकेत जमा केले असता ते वटले नाहीत. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याकडे पैसे मिळत नसल्याने तगादा लावल्यानंतर तरी सुद्धा पैसे मिळाले नाहीत. म्हणून बाळासाहेब कोठुळे या शेतकऱ्याने न्याय प्रक्रियेद्वारे जाण्याचा निर्णय घेतला.

सुमारे पाच वर्षानंतर सदर शेतकऱ्याला न्याय मिळाला. संबंधित व्यापारी आज चांदवड न्यायालयाने कारावास सुनावल्यानंतर इतरही फसवणूक केलेले व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

 व्यापाऱ्यांना या निकालाने बसणार जरब

 या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने पहिल्याच ओळीत बॉल बाउन्स केल्यास तो खेळ समजला जातो. पण चेक बाउन्स केल्यास तो गुन्हा असल्याचे कडक ताशेरे ओढले आहेत. आरोपी दवंगे यास चेक बाऊन्स प्रकरणी झालेली सहा महिन्यांची शिक्षा टाळायची असेल तर त्या सिक्युरिटी बॉण्ड सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे

अशा शेतकऱ्यांसाठी हा निकाल खूप महत्त्वाचा मानला जात असून यामुळे फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठी जरब बसेल असा विश्वास शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:काळ्या रंगाचा मका देखील येतो? जाणून घेऊ कोणत्या हंगामात करतात याची लागवड

नक्की वाचा:1 इंच माती आहे जीवनाधार! आज आपण मातीला वाचवले नाही तर उद्या माती आपल्याला वाचवणार नाही

नक्की वाचा:दुग्ध व्यवसायासह पशुधन देखील अडचणीत; आता शेतकरी आणखी खोलात

English Summary: grape farmers decesive by treders so session court punish to treders Published on: 30 April 2022, 09:59 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters