इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ रायपुर चार कृषी शास्त्रज्ञांनी माती परीक्षण किट तयार केले आहे. या किटची किंमत ६ हजार रुपये असून त्यासाठी शेतकऱ्यांना 20 ते 25 टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. या किटच्या साह्याने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण सहजरित्या करता येणार आहे.
या कीटच्या सहाय्याने मातीमधील नायट्रोजन, फास्फोरस, पोटॅशियम आणि पीएच ची माहिती तंतोतंत मिळणार आहे. या किटची निर्मिती डॉक्टर पाटील, डॉक्टर श्रीवास्तव, डॉ. मिश्रा या साऱ्यांनी अथक परिश्रमातून विकसित केले आहे. या किट मुळे शेती क्षेत्रात अनेक प्रकारचे बदल घडून येऊ शकतात. शेतकरी स्वावलंबी व हुन आपल्या शेतामध्ये माती परीक्षण करून घेऊ शकतात. हे किट इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ रायपूर यांच्यामार्फत विकले जाणार आहे.
याच्या साह्याने मातीच्या आरोग्याची तपासणी करता येणार असल्याने यामध्ये नायट्रोजन, फास्फोरस, पोटॅशियम आणि मातीत असलेल्या पीएच चे मूल्य किती असावे, संबंधीत मातीमध्ये कोणत्या खताचा अभाव आहे हे मातीच्या रंगावर अवलंबून असते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माती परीक्षण करून माती आरोग्य कार्ड देण्यात आले आहे.
या कार्ड मध्ये कोणत्या शेतात कोणत्या खताचा अभाव आहे हे तंतोतंत सांगितले जाते. ही चाचणी करण्यासाठी जिल्ह्यात चाचणी केंद्र स्थापन केले गेले आहेत. तिथे माती परीक्षणाचा निकाल लागण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात. परंतु या किटच्या सहाय्याने शेतकरी स्वावलंबी होतो त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचू शकतो.
Share your comments