1. बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या परतफेडीवर मिळणार सवलत

नवी दिल्ली: शेतकऱ्यांनी बँकाकडून घेतलेले सर्व अल्पमुदतीचे पीक कर्ज जे 1 मार्च 2020 आणि 31 मे 2020 दरम्यान देय आहे किवा असेल, अशा कर्जाची परतफेड मुदत 31 मे 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आता 31 मे 2020 पर्यंत कोणत्याही दंडात्मक व्याजाशिवाय केवळ 4 टक्के प्रतिवर्ष व्याजदराने आपल्या पीक कर्जाची परतफेड करु शकणार आहेत.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
 शेतकऱ्यांनी बँकाकडून घेतलेले सर्व अल्पमुदतीचे पीक कर्ज जे 1 मार्च 2020 आणि 31 मे 2020 दरम्यान देय आहे किवा असेल, अशा कर्जाची परतफेड मुदत 31 मे 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आता 31 मे 2020 पर्यंत कोणत्याही दंडात्मक व्याजाशिवाय केवळ 4 टक्के प्रतिवर्ष व्याजदराने आपल्या पीक कर्जाची परतफेड करु शकणार आहेत.

सध्या लोकांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध असल्यामुळेअनेक शेतकरी अल्प मुदतीच्या पीक कर्जाची थकबाकी भरण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. याशिवाय लोकांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध आणि वेळेत विक्री करण्यात येणारी अडचण आणि त्यांच्या उत्पादनाची रक्कमही न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना या कालावधीत पडणाऱ्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाची पतफेड करण्यात अडचणी येऊ शकतात.

शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी31 मे 2020 पर्यंतच्या 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाच्या व्याज अनुदान (आयएस) आणि वेळेत परतफेड प्रोत्साहन लाभाची मुदत 31 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा कर्जाची परतफेड 4 टक्के वार्षिक व्याजदराने कोणताही दंड न आकारता करता येणार आहे.

सरकार बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवीत आहे. ज्यामध्ये बँकांना 2 टक्के व्याज अनुदान दिले जाते. आणि कर्ज परतावा वेळेवर  केल्यास शेतकऱ्यांना 3 टक्के अतिरिक्त लाभ अशाप्रकारे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्यास दरसाल 4 टक्के व्याज आकारले जाईल.

English Summary: govt gives benefits to farmers on crop loan repayments due to covid-19 lockdown Published on: 02 April 2020, 07:57 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters