वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. देशातील १३ राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहे. त्यात भगतसिंह कोश्यारी यांचा समावेश आहे. आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे.
रमेश बैस सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापुर्वी २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले. सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते. बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यापालांची नियुक्ती केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्रासह या राज्यांचे राज्यपाल बदलले
रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
लेफ्टिनेंट जनरल कैवल्य त्रिविक्रम, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्किम
सीपी राधाकृष्णनन, राज्यपाल, झारखंड
शिव प्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसम
निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ़
अनुसुईया उइके, राज्यपाल, मणिपूर
एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड
फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
ब्रिगेडियर (रिटायर्ड) बीडी मिश्रा, उपराज्यपाल, लडाख
Share your comments