मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत राज्यपालांकडून नियुक्त आमदारांची यादी मंजूर करण्यासाठी दिली होती. आता मात्र या यादीबाबत राज्यपाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत राज्यपालांकडून नियुक्त करण्यासाठी दिलेली आमदारांची यादी रद्द करण्यात आली आहे. राजभवनने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली आमदारांची यादी रद्द करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा: "बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी भाजप आखली रणनीती"; पवारांची चिंता वाढली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये विधान परिषदेतल्या १२ जागांसाठी राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. पण राज्यपालांनी ही यादी मंजूर केली नाही. त्यामुळे विधान परिषदेतल्या १२ जागा आता रिक्त आहेत. या जागांवर शिंदेंचं सरकार आता नवीन नावे देणार आहेत.
हेही वाचा: मोठी बातमी: भाजपकडून मुंबईत दंगल घडवण्याचा प्रयत्न; शिवसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
ठाकरे सरकारच्या या यादीला राज्यपालांकडून केराची टोपली दाखवण्यात आली असून शिंदे फडणवीस सरकारकडून आता १२ आमदारांना विधानपरिषदेवर नियुक्त करण्यासाठी यादी पाठवण्यात येणार आहे.
हेही वाचा: IMD Alert: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय; या भागात यलो अलर्ट
Share your comments