सरकारची नवी योजना; 'या' दोन पोर्टलच्या माध्यमातून मिळेल रेशनकार्डची माहिती

03 August 2020 02:10 PM By: भरत भास्कर जाधव


रेशन कार्डच्या माध्यमातून भारताच्या नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य दिले जाते. या कोरोनासारख्या संकटात राज्यातील ६ कोटी रेशनकार्डधारकांना कमी दरात अन्नधान्य मिळाले आहे. हे रेशनकार्ड राज्य सरकारकडून दिले जाते. या कार्डच्या उपयोग फक्त अन्नधान्य घेण्याशिवाय अनेक शासकीय कामांसाठी केला जातो. रेशन कार्डमार्फत मिळणाऱ्या सुविधांची माहिती बऱ्याच लोकांना नसते. नागरिकांच्या मनात नेहमी याविषयी अनेक प्रश्न असतात. या समस्या दूर करण्यासाठी सरकारने आता दोन पोर्टल तयार केले आहेत. यामार्फत आपण आपली कोणतीही रेशन कार्डसंबंधित समस्येचे निरसन होणार आहे. या दोन पोर्टलमधील पहिल्या पोर्टलचे नाव आहे, aanavitran.nic.in (अन्नवितरण) us हे आहे. दुसऱ्या पोर्टलचे नाव आहे, इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ पब्लिक डिस्ट्रब्युशन सिस्टम (IM-PDS) पोर्टल हे आहे.

IM-PDS कार्ड इंटर -स्टेट पोर्टेबिलिटसाठी तांत्रिक व्यासपीठाची व्यवस्था करते.  याचा फायदा प्रवाशी मजदुरांना होतो. जेणेकरून प्रवाशी मजदूर देशातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून राशन घेऊ शकतील.  तर अन्नवितरण एक राज्यातील ई-पीओएस उपकरणांच्या मदतीने डिस्ट्रीब्यूट वितरित झालेले धान्याचा साठा केला जातो.   याच्यामार्फत एका राज्यात असलेल्या मजदुरांना आपल्या जिल्ह्याशिवाय आपल्या राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यात राशन मिळू शकते. जर आपण रेशन कार्डसाठी अर्ज करू इच्छित आहात तर आपल्याला राज्य सरकारच्या अन्न आणि पुरवठा विभागाच्या पोर्टलवर जावे लागेल.  या पोर्टेलवरून आपल्याला रेशन कार्ड अर्ज डाऊनलोड करावा लागेल.  भरलेला अर्ज हा आपल्या जवळील स्वस्त धान्य दुकानदाराकडे द्यावा लागेल.  ग्रामीण क्षेत्राताली लोक हा अर्ज तहसील कार्यालयात जमा करु शकतील. या पोर्टलवर रेशन कार्डविषयी मिळणाऱ्या सुविधांची माहिती अपडेट केली जाते.

जर आपल्याला रेशन कार्ड बनवायचे असेल आपण राज्य सरकराच्या पोर्टलवर जाऊन तेथे रेशन कार्डसाठी अर्ज करु शकता.  जर आपल्याला नवे रेशन कार्ड हवे असेल तर mahafood.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.  या संकेतस्थळावरुन आपण आपली तक्रारही दाखल करु शकता.

आवश्यक कागदपत्रे

  • तलाठी रहिवासी दाखला व उत्पन्नाचा दाखला
  • लाइट बिल, घरफाळा पावती
  • घरमालकाचे संमतीपत्र
  • १० रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प
  • प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हीट)
  • धान्य दुकानदाराचे पत्र
  • आधार कार्ड झेरॉक्स
  • बँक पासबुक झेरॉक्स व महिलेचे दोन फोटो

नवीन रेशनकार्ड कोणाला मिळते आणि कागदपत्रे -

जर आपल्याला ई- महासेवा केंद्रातूनही आपण रेशन कार्डसाठी अर्ज करु शकता. यासाठी आपण https://www.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज डाऊनलोड करा.

बाहेरगावाहून आलेले असल्यास : बाहेरगावाहून आलेले असल्यास त्याठिकाणच्या संबंक्षित सक्षम अधिकाऱ्याचा (तहसिलदार) स्थलांतराचा दाखला, रेशनकार्ड मूळप्रत.

ज्यांचे रेशनकार्ड कोठेच नाही : रेशनकार्डमध्ये कोठेच नाव नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र, तलाठ्याचा रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, लाइटबिल, भाडेकरू असल्यास घरमालकाचे संमतीपत्र, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक व ज्या महिलेच्या नावाने कार्ड काढावयाचे आहे त्यांचे दोन फोटो. विभक्त कुटुंब असेल तर : वरील कागदपत्रांशिवाय विभक्त राहत असल्याचा सरकारी पुरावा उदा. लाइटबिल, घरफळा पावती, ग्रामपंचायत असेसमेंट उतारा यापैकी एक पुरावा. विभक्त राहत असल्याचे प्रतिज्ञापत्र वडिलांनी किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीने लिहून दिलेले असावे.

ration card ration card information portal aanavitran अन्नवितरण portal aanavitran portal ration card holder इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ पब्लिक डिस्ट्रब्युशन सिस्टम Integrated Management of Public Distribution System रेशन कार्ड रेशन कार्ड माहितीचे पोर्टल
English Summary: Government's new scheme; ration card information will be available through these two portals

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.