1. बातम्या

सरकारचे काजू उत्पादन वाढीसाठी प्रयत्न, काजू उत्पादकाला सरकार देणार अल्प व्याजदरात कर्ज

देशात कृषी उत्पादनात सतत वाढ व्हावी या साठी सरकार नेहमी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत . यंदाच्या वर्षी काजू पिकासाठी आवश्यक हवामान असल्यामुळे यंदाच्या वर्षी काजूचे उत्पादन वाढणार आहे. तसेच काजू उत्पादन वाढीसाठी चक्क सरकारने पुढाकार घेतला आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन यांच्या वाढीसाठी खास प्रयत्न करत आहे.तसेच सरकारने काजू उत्पादकांसाठी मदत आणि दिलासा देण्यासाठी सरकार कमी व्याजदरात भांडवल उपलब्ध करून दिले जात आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
cashew

cashew

देशात कृषी उत्पादनात सतत वाढ व्हावी या साठी सरकार नेहमी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. यंदाच्या वर्षी काजू पिकासाठी आवश्यक हवामान असल्यामुळे यंदाच्या  वर्षी  काजूचे उत्पादन वाढणार आहे. तसेच काजू उत्पादन वाढीसाठी चक्क सरकारने पुढाकार घेतला आहे. कोकणच्या  सर्वांगीण  विकासासाठी  सरकार  कोकणात  मत्स्यव्यवसाय, फळबाग,  दुग्धव्यवसायासह पर्यटन यांच्या वाढीसाठी खास प्रयत्न करत आहे.तसेच सरकारने काजू उत्पादकांसाठी मदत आणि दिलासा देण्यासाठी सरकार कमी व्याजदरात भांडवल उपलब्ध करून दिले जात आहे.

कोकणाला निसर्गाचे वरदान:

राज्य सरकारच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून व्याज दर सवलत योजना काजू उत्पादकांसाठी घेतली जाणार आहे. हा निर्णय निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  बैठकीत निर्णय घेतला आहे.कोकणाला निसर्गाचे वरदान कोकण किनार पट्टीला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे आंबा, काजू, फणस याला पोषक वातावरण असल्यामुळे कोकणात काजू चे व इतर फळांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते.

परंतु अधिक काजू उत्पादन वाढीसाठी सरकार सुद्धा मदत करत आहे. तसेच सरकारच्या मदतीने आणि वतीने सुद्धा काजू उत्पादन शेतकरी वर्गाला मदत केली  जात  आहे. जिल्हा  बँकेतून मिळणारे कर्ज हे कमी व्याजदरात मिळणार असल्यामुळे हे फायदेशीर आहेतसेच काजू उत्पादन घेण्या वेळेस शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या समस्या येतात याचा सुद्धा आढावा मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळं सर्वात जात भर हा कृषी उत्पादन वाढण्यासाठी मंत्री मंडळात बैठक घेण्यात आली होती.काजूचे उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने बियाणे सुद्धा आधुनिक आणि विकसित करण्याचा सूचना उपमुख्यमंत्री यांनी केली आहे.

जर का बियाणे विकसित असतील तरच काजू उत्पादनात वाढ होईल असे डॉक्टर भारत दळवी यांनी सांगितले आहे. जर का विकसित बियाणे असतील तरच  स्थानिक  पातळीवर  काजूचे उत्पादन वाढणार आहे.तसेच काजू उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या अडचणी येतात या विषयी आढावा घेणे सुद्धा गरजेचे आहे. त्यासाठी मंत्रिमंडळात बैठक सुद्धा झाली आहे.

English Summary: Government's efforts to increase cashew production, the government will provide low-interest loans to cashew growers Published on: 28 October 2021, 08:24 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters