भारतात रेर्शनकार्डधारकांची संख्या कोटींच्या घरात आहे. रेशनकार्डधारकांना शासनाकडून दिले जाणारे रेशन मिळवण्यासाठी लोकांना वेळोवेळी सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानावर जावे लागते व आपल्या वाट्याला मिळेल तेवढे धान्य घेण्यासाठी लांब अशा रांगेत उभे राऊन नंबर वाईज धान्य घेण्यासाठी तासनतास वेळ खर्च करावा लागतो आणि यामध्ये त्यांचा कुठले दुसरे काम ही होत नाही आणि वेळही वाया जातो. ही समस्या वर्षानुवर्षे सुरू आहे.
म्हणून आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि या समस्येतून सुटका करायचे ठरवले आहे जेणेकरून स्वस्त धान्य घेणाऱ्या लोकांना या समस्येला सामोरे जान्याची गरज येऊ नये. आता रेर्शनकार्डधारकांना ना लांब रांगेत उभे राहावे लागणार आहे ना उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे. म्हणजेचं आता रेशन घेण्यासाठी नागरिकांना सरकार स्वस्त धान्य दुकानात जाण्याची गरज भासणार नाही.
उत्तराखंड सरकारचा अनोखा उपक्रम
वास्तविक, उत्तराखंड सरकार काहीतरी असं भन्नाट करणार आहे ज्यामुळे धान्य घेणार्या लोकांना या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळणार आहे आणि त्यांना त्यांचे धान्य सहज मिळू शकेल. उत्तराखंड सरकार आता 'फूड ग्रेन एटीएम'चे काम सुरू करणार असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ते लागू करण्यात आले आहे.
ज्याप्रमाणे सामान्य माणूस एटीएममधून पैसे काढतो, त्याचप्रमाणे लोक अन्नधान्याच्या एटीएममधून धान्य घेऊ शकतील. उत्तराखंडच्या अन्न पुरवठा मंत्री रेखा आर्य यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे नागरिकांना लांब अशा रांगेत उभे राहावे लागणार नाही, उन्हाचा त्रास किंवा इतर समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, असे ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, उत्तराखंडमध्ये सहसा दूर असलेल्या खेड्यातील लोक धान्य घेण्यासाठी सरकार स्वस्त धान्य दुकानात पोहोचतात, मात्र लांबलचक रांगेमुळे त्यांचा संपूर्ण दिवस त्यातच जातो. हे लक्षात घेऊन सरकारने हा नवा उपक्रम सुरू केला आहे.
लवकरच ही योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार असल्याचे अन्नमंत्री रेखा आर्य यांनी सांगितले आहे. ही योजना देशभर राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हरियाणा आणि ओडिशात फूड ग्रेन एटीएम योजना आधीच सुरू आहे. ही योजना आता लवकरच लागू करणारे उत्तराखंड हे देशातील तिसरे राज्य ठरले आहे.
Share your comments