1. बातम्या

दुष्काळसदृश परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना भरीव मदत करणार

औरंगाबाद: सद्यपरिस्थितीत निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही सद्यपरिस्थिती शेतकऱ्यांसाठी अनुकूल नाही. परंतु आगामी काळात हा निसर्ग शेतकऱ्यांना भरभरून देईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी हताश होऊ नये. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना भरीव मदत करणार असल्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे सांगितले.

KJ Staff
KJ Staff


औरंगाबाद:
सद्यपरिस्थितीत निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही सद्यपरिस्थिती शेतकऱ्यांसाठी अनुकूल नाही. परंतु आगामी काळात हा निसर्ग शेतकऱ्यांना भरभरून देईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी हताश होऊ नये. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना भरीव मदत करणार असल्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे सांगितले.

सटाना गावचे उपसरपंच नारायण धावटे, देवणी वाहेगावच्या सरपंच वैशाली अशोकराव शिंदे, जटवाडा येथील सरपंच पुनम चव्हाण, पिंपळखुटा सरपंच मनीषा डोंगरे, शेतकरी अशोक शिंदे, राहुल शिंदे, साहेबराव पाटील, बाबासाहेब पाटील, तुळशीराम कोरडे यांच्यासह गाढेजळगाव, ओहर, धोपटेश्वर येथील शेतकऱ्यांशी डॉ. सावंत यांनी थेट बांधावर जाऊन संवाद साधला. संवाद साधताना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले.

बोंडअळी अनुदानाचा शेवटचा हप्ता, प्रलंबित कर्ज प्रकरणे, आदीसह मत्स्यबीजसाठी मुदतवाढही लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी डॉ. सावंत यांनी दिले. दुध उत्पादनक शेतकरी, फळबाग उत्पादक शेतकरी यांना शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून भरीव मदत देण्यात येणार आहे. शासन हे शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील असून दुष्काळी परिस्थितीत जास्तीत-जास्त गावातील शेतकऱ्यांच्या हाताला कामे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

सिना-कोळेगाव धरणाप्रमाणे जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये चर पाडण्यात येईल. यामुळे पाणी पातळीत वाढ होऊन भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल. कापूस, मका, तूर, सोयाबीन आदी पिके हातची गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी विचाराधीन असून त्याबरोबरच जनावरांसाठीच्या चारा-पाण्याची घरपोच सोय करण्यासाठी विशेष तरतूद करणार आहे. तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांसाठी टँकरची व्यवस्था करण्यात आलेली असून जिल्हा प्रशासनाने संबंधीत गावांना 48 तासात टँकर उपलब्ध करून द्यावे, असे आदेश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. शेततळ्यासाठीच्या अस्तारीकरणाचे अनुदान दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधीत यंत्रणेकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

पीक पाहणी नंतर पिंपळखुटा येथे शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा करतांना पालकमंत्री म्हणाले की, शासन दुष्काळ निवारणासाठी सकारात्मक असून अधिकाऱ्यांनीही उत्तम प्रकारे काम करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे. या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी डॉ. सावंत यांनी आज येथे दिल्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयाणी डोणगावकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तुकाराम मोटे, तहसिलदार सतीश सोनी, कृषि अधिकारी बाळासाहेब निकम, तालुका कृषी अधिकारी विश्वास जाधव, पंचायत समिती सभापती तारामती उकीर्डे, अंबादास दानवे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

English Summary: Government will be help the farmers in drought situation Published on: 30 October 2018, 03:10 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters