एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार २ हजार रुपये

27 March 2020 01:07 PM


शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेतर्गंत शेतकऱ्यांना २ हजार रुपयांचा पहिला हफ्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भेटणार आहे. सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हा पैसा पाठवणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी गुरुवारी दिली. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यामुळे साधारण ८.६९ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असून सरकार गरीब जनतेसाठी अनेक निर्णय घेत असल्याचे त्या म्हणाल्या. अर्थमंत्र्यांनी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर ३६ तासात मोठ्या  घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान शेतकरी योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ रुपये दिले जातात.  'आम्ही याचा पहिला हफ्ता हा आधीच देऊ, जेणेकरून शेतकऱ्यांना वित्त वर्षाच्या सुरुवातीलाच २ हजार रुपये मिळतील', असे त्या म्हणाल्या.  या निर्णयामुळे ८.६९ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.  बळीराजा १३० कोटी जनतेसाठी अन्न उत्पादित करत असतो. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक अर्थिक वर्षात तीन हफ्त्यात योजनेची रक्कम देत असते. हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो.

modi government finance minister Nirmala Sitharaman PM-KISAN april month money मोदी सरकार अर्थमंत्री निर्मला सीतारामण पीएम-किसान एप्रिल महिना पैसा
English Summary: government transfer 2000 rs under pm kisan scheme in april's 1st week

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.