शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून दोन्ही सरकार (Central Government) प्रयत्न करत आहे. शेती व्यवसायात (Agricultural business) नवनविन प्रयोग राबवण्यासाठी केंद्राने अनेक योजना सुरु केल्या आहेत. मोदी सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला आहे.
गेल्या 6 वर्षात सरकारने काय प्रयत्न केले आहेत याची माहिती खुद्द केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले आहे. सातसुत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येणार असल्याचे सांगितले आहे. लोकसभेच्या प्रश्नोत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे.
केंद्र सरकारचे सात सूत्र
१. पशूधनातून उत्पादनात वाढ
२. अधिकचे उत्पन्न मिळेल असेच उत्पादन घेण्यावर भर देणे
३. शेतीमालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांना त्यांची चांगली किमंत मिळवून देण्याचा प्रयत्न
४. एका वर्षामध्ये एकच पीक न घेता यामध्ये वाढ करणे
५. पीक उत्पादनात वाढ
६. उत्पादन खर्च कमी आणि शेतकऱ्यांना संसाधनाचा वापर करुन त्यांचे काम सुखकर करुन देणे.
७. शेती या मुख्य व्यवसायाबरोबरच इतर जोडव्यवसयातून उत्पन्न वाढविणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र संस्था सरकारचे हे नियोजन केवळ हवेतच राहणार नाही. यासाठी केंद्राकडून आढावा घेतला जात आहे. याकरिता एका संस्थेची उभारणी करण्यात आली आहे.
सातसुत्री कार्यक्रम प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे. समितीची स्थापना आणि उद्दीष्ट केंद्र सरकारने 2016 सालीच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण आखले होते. याकरिता आंतरमंत्रालयीन समितीची स्थापना करण्यात आली होती.
या समितीने 2018 सरकारला एक अहवाल सादर केला आहे. यामध्ये 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल हे स्पष्ट करण्यात आले आहे. या समितीनेच शेतीला मूल्याधारित उद्योग म्हणून मान्यता दिली आहे.
हेही वाचा :
Breaking : आता शेतकऱ्यांच्या मागे लागणार चौकशी; ज्यांचे उत्पन्न १० लाख आहे त्यांना...
शेतकऱ्यांनो शेतीची उपकरणे घ्यायची असतील तर ही बातमी वाचाच; होईल फायदाच फायदा
Share your comments