मुंबई: कालच मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) झाला आहे. पण शिंदे फडणवीस सरकारवर सर्व क्षेत्रातून टीकेची झोड उठली आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (MP Priyanka Chaturvedi) यांनी नवे सरकार लवकरच पडणार असल्याचे भाकित केले आहे.
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नवे सरकार लवकरच पडणार असल्याचे भाकित केले आहे. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना एकच शिवसेना आहे. आणि ती उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार असल्याचे देखील त्या म्हणाल्या आहेत.
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; खाद्यपदार्थांच्या किंमतीत मोठी वाढ
कोण आहेत बिहारचे न होऊ शकलेले एकनाथ शिंदे? नितीशकुमारांनी उद्धव ठाकरे होण्याआधीच ओळखली गेम, आणि...
बिहारमध्ये भाजप-जेडीयू युती तुटणे जवळपास निश्चित झाले असून भाजपनेही नितीशकुमार यांच्यापासून वेगळे होण्याचे मन बनवले आहे. दरम्यान, एक नवीन समीकरण तयार होत आहे.
नितीश कुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून आता ते पुन्हा राजदसोबत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे सर्व 16 मंत्री राजभवनात जाऊन राज्यपालांकडं राजीनामे सादर केले आहेत.
सावधान! जग आणखी एका संकटाच्या उंबरठ्यावर; चीनमध्ये सापडला नवा विषाणू, अनेकांना लागण
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार सरकार पाडणार नाहीत किंवा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. नितीशकुमार भाजपच्या कोट्यातील मंत्र्यांना बडतर्फ करू शकतात.
मंत्रिमंडळात 16 मंत्री भाजपच्या कोट्यातील आहेत, त्यापैकी दोन उपमुख्यमंत्री आहेत. दरवेळेप्रमाणेच नितीशकुमार यावेळीही काही नवीन पद्धत आणू शकतात. मंत्र्यांची हकालपट्टी झाल्यास नितीशकुमार यांना लगेचच महाआघाडीचा पाठिंबा मिळेल.
Share your comments