झारखंड राज्यातील शेतकऱ्यांसाठी(farmers) एक आनंदमयी बातमी झारखंड सरकारने दिली असून तेथील शेतकरी सुद्धा खूप खुश झाले आहेत पण नक्की कोणत्या मार्गाने सर्व नियोजन होणार आहे किंवा हा लाभ पहिला कोणाला होणार आहे आणिहळू हळू म्हणजे दुसऱ्या टप्यात कोणाला होणार आहे याची सर्व माहिती सूत्रांच्या अहवालानुसार समजले आहे.
सुमारे ९८० कोटी रुपये कर्ज माफ होणार :
झारखंड सरकारने पूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ची घोषणा केली असून राज्यातील २ लाख ४६ हजार शेतकऱ्यांना ही दिलासादायक बातमी आहे, सुमारे ९८० कोटी रुपये कर्ज माफ होणार आहे.त्या घोषनेदरम्यान असेही सांगण्यात आले की आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नेहमी उभे आहोत. झारखंड राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी डिसेंम्बर २०२० रोजी एक वर्ष सरकारला झाल्याबद्धल ही मागणी केली होती आणि पहिल्या टप्यात ५० हजारपर्यंत कर्ज माफी करण्यात निर्णय घेतला. तसेच त्यांनी असे सांगितले की टप्याटप्याने आम्ही कर्जमाफी करणार आहोत.
हेही वाचा:यंदा कापसाचे क्षेत्र २० टक्क्यांनी कमी तर सोयाबीन, तुरीची लागवड अधिक होण्याची शक्यता
आत्तापर्यंत सरकारने २ लाख ४६ हजार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे, त्यासाठी सरकारने ९८० कोटींच्या निधी सुद्धा पाठवला होता. सरकारने तेथील असलेल्या बँकांची मदत घेऊन अधिक अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी असेही सांगितले आहे. त्यासाठी तिथे असलेल्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले खाते लिंक करावे असे सांगितले आहे.
झारखंड राज्याचे अर्थमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामेश्वर उरांव यांनी असे सांगितले आहे की सर्वात आधी म्हणजे पहिल्या टप्यात जे राज्यातील छोटे शेतकरी आहेत त्यांचे कर्ज माफ होईल.आणि नंतर मोठे शेतकरी म्हणजे ज्यांचे कर्ज २ - ३ लाख आहे त्यांचे माफ होईल, असे त्यांनी एका हिंदी वेबसाईटद्वारे सांगितले आहे.
Share your comments