मुंबई
स्वातंत्र दिनाच्या मूहर्तावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. त्यामुळे ५० रुपये किलोने टोमॅटो विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सरकारने केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने एनसीसीएफ (NCCF) आणि नाफेडला (NAFED) टोमॅटो ५० रुपये किलोने विकण्याच्या सूचना दिल्या आहेत. घाऊक बाजारात टोमॅटोच्या किमतीत घट झाली असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितलं आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीतील एनसीआरमध्ये ५० रुपये किलोने टोमॅटोची विक्री (दि.१४) पासून विक्री सुरु करण्यात आली आहे. १३ ऑगस्ट पर्यंत नाफेड आणि NCCFने किरकोळ बाजारात १५ लाख किलो टोमॅटोची खरेदी आणि विक्री केली आहे. दिल्ली एनसीआर व्यतिरिक्त राजस्थानमधील जोधपूर कोटा, उत्तर प्रदेशातील लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज आणि बिहारमधील पटना, मुझफ्फरपूर, आराह, बक्सरमध्ये टोमॅटो स्वस्त दरात विकले गेले आहेत.
दरम्यान, ग्राहक व्यवहार विभागाच्या सूचनेवरून NCCF आणि NAFED ने आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मंडईतून टोमॅटोची खरेदी सुरू केली होती. गेल्या महिनाभरात टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ झालेल्या भागातील ग्राहकांना ते उपलब्ध करून देण्यात आलेत.
Share your comments