राज्यातील महिलांचा विकास व्हावा, त्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी सरकार काम करत आहे. राज्य सरकार त्यादृष्टीने काम करत असून त्याविषयीची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसेच या सोसायटीमार्फत राबवण्यात येणारे विविध उपक्रम मधील ३० टक्के निधी हा महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी वापरणे, विद्यार्थीदशेतच महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनी उद्योजकता क्लब स्थापन करणे असे विविध उपक्रमही या कार्यक्रमाद्वारे राबवण्यात येणार आहेत अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
दरम्यान या संदर्भाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल असेही नवाब मलिक म्हणाले. महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह, महाराष्ट्र स्टार्ट आणि इनोव्हेशन्स यात्रा, नवउद्योजकांना पेटंट मिळविण्यासाठी तसेच गुणवत्ता परीक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना असे बऱ्याच प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यापुढे सर्व उपक्रमांमध्ये महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल.
महिला उद्योजकता कक्षामार्फत महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी शासनाची विविध शासकीय विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, नॅसकॉम, सी आय आय, असोचेम इत्यादी नामवंत संस्थांसोबत भागीदारीने करण्यात येणार आहे. तसेच महिला बचत गट, महिला उद्योजक यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या नावाचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्व व्यवस्थापन, आर्थिक व डिजिटल साक्षरता, व्यवसायाचे नियोजन विकास आदी प्रशिक्षण देण्यात येतील. तसेच महिला उद्योजकांच्या चालविण्यात येणाऱ्या विकसित स्टार्टअप च्या स्तुती करण्यासाठी व त्यांच्या उद्योगास चालना देण्यासाठी विविध प्रकारचे एक्सलेटर कार्यक्रम राबवण्याचे ठरले आहे.
महिलांचे नेतृत्व च्या उद्योगांमध्ये आहे अशा स्टार्ट सणात आरंभिक टप्प्यात अर्थसाहाय्य करणे, विकसित स्टार्ट पला अधिकृत निधी करता स्टार्ट परिसंस्थेतील गुंतवणूकदारांची समन्वय साधून देणे, संशोधन व विकास क्षेत्रात तसेच तांत्रिक उद्योजकता क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या महिलांना विशेष अनुदान पुरवणी इत्यादी करिता महिला उद्योजकता कक्षामार्फत विविध उपक्रम व योजना राबविण्यात येतील. असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.मुलींमध्ये विद्यार्थीदशेतच उद्योजकतेच्या गुणांचा विकास व्हावा, यासाठी महिला उद्योजकता कक्षामार्फत राज्यातील विविध विद्यापीठे, महिला महाविद्यालय, इत्यादींमध्ये विद्यार्थिनी उद्योजकता क्लब स्थापन करण्यात येतील व या क्लबच्या माध्यमातून विद्यापीठ स्तरावर तसेच आंतर विद्यापीठ, व आंतर महाविद्यालयीन स्तरावर परिसंवाद, प्रशिक्षण, अभ्यास दौरे, मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येतील.
सध्या विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या गांधी विचारधारा केंद्र, ग्रामीण अध्ययन केंद्र, महिला विकास कक्ष याप्रमाणे महिला उद्योग केंद्र स्थापन करण्यात येतील. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यकारी व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे.
संदर्भ- कृषी नामा
Share your comments