Mumbai News : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ज्यांची कुणबी नोंदी असल्याचा पुरावा सापडला आहे. त्यांना उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
या बैठकीसाठी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, न्या संदीप शिंदे (निवृत्त), मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे, विशेष निमंत्रित मंत्री दिलीप वळसे पाटील, दीपक केसरकर, समितीचे सदस्य मंत्री दादा भुसे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, उदय सामंत, आमदार प्रवीण दरेकर, योगेश कदम, भरत गोगावले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ , मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे -
१) गायकवाड समितीने केलेल्या शिफारशींचा पुन्हा एकदा आज आढावा होण्याची शक्यता
२) सारथी संस्थेसह मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या उपायोजना याबाबत आढाव घेणार
3) उद्या मंत्रिमंडळात अहवाल सादर झाल्यानंतर तो स्वीकारु
४) समितीला मुदतवाढ असली तर अहवाल लवकर सादर करु
५) मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा आढावा घेतला जाईल
Share your comments