हे सरकार तुमच्याच आहे पण सरकारला लुटू नका. असासल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला. बारामती येथील माळेगाव येथे राजहंस संकुल संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. रस्ता रुंदीकरणाच्या मुद्द्यावर बोलत असताना अजित पवार यांनी हे भाष्य केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, रस्ता रुंदीकरण होत असताना लोकांनी रस्त्याच्या बाजूला झाडे लावलीत.नेमका त्याच भागात लोकांनी झाडे लावली. दुसऱ्या बाजूला झाडे लावली नसल्याचे दिसून आले यावर प्रांताधिकारी यांना विचारले तर त्यांनी सांगितले की आंबा, नारळ याची झाडे लावली की जास्त पैसे मिळतात. त्यामुळे लोक अशी झाडे जास्त लावतात असे त्यांनी सांगितले. त्यावर अजित पवार यांनी हे सरकार देखील तुमचेच आहे, मात्र सरकारला लुटू नका अशा आशयाचे वक्तव्य केले आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सीएनजी किट असलेल्या ट्रॅक्टरचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की, सीएनजी किट मध्ये दहा किलो गॅसची क्षमता आहे. सीएनजी मुळे चार ते साडेचार किमी इतका मायलेज देतो. त्यामुळे इंधनाची 40 टक्के बचत होणार आहे. असे मला सांगण्यात आले आहे मात्र माझ्या ट्रॅक्टरला मी अजून सिएनजी बसवले नाही त्यामुळे याबाबत मला अजून जास्त माहिती नाही असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांची एसटी कर्मचाऱ्यांना विनंती
संप करीत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आता पाच ते सात हजारांच्या आसपास पगारवाढ देण्यात आली आहे. परंतु कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी आहे त्यामुळे सरकारने एक समिती नेमली आहे. एसटी कर्मचारी देखील आपलेच आहेत मात्र हे असेच( विलिनीकरण )करा असे सांगता येत नाही. एसटी सेवा सुरू करावी अशी विनंती अजित पवार यांनी संपकऱ्यांना केली आहे.( संदर्भ- दिव्य मराठी )
Share your comments