पिक विम्याच्या बाबतीत ज्या शेतकऱ्यांनी या पिकांसाठी तक्रार दिली होतीत्यांना त्याचा पिकाच्या पीक वाढीच्या अवस्था, नुकसानीची टक्केवारी व पूर्वसूचना ज्या महिन्यामध्ये दिली त्या कालावधीनुसार पिक विमा वाटप करण्यात आला आहे
परंतु ज्या शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत नुकसानीची पूर्वसूचना दिली नव्हती, या शेतकऱ्यांच्या पीक कापणी प्रयोग आधारित महसूल मंडळ निहाय पिक विमा लागू झाल्यास राज्य व केंद्र सरकारचा दुसरा हप्ता प्राप्त झाल्यानंतर पिक विमा वाटप करण्यात येईल.
शासन निर्णय
- शासन निर्णय क्र.प्रपीवियो-2020/ प्र. क्र.40/11-ऐदिनांक 29 जून 2020 नुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 -22 परभणी जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यास मान्यता मिळाली.
माहे जुलै व सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी शासन निर्णय मुद्दा क्रमांक 10.4 नुसार वैयक्तिक स्तरावर स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची एकूण 3 लाख 78 हजार 307 शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीस विविध मार्गांनी नुकसानीच्या पूर्व सूचना दिल्या.
- त्यापैकी तीन लाख 51 हजार 160 शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना पिक विमा कंपनीने पात्र ठरवल्यावर उर्वरित 27 हजार 147 शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना परत परत असल्यामुळे पिक विमा कंपनीने अपात्र ठरवले आहेत.पात्र ठरलेल्या तीन लाख 51 हजार 160 शेतकऱ्यांसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 272.24 कोटी पीक विमा मंजूर करण्यात आला.
- त्यापैकी दिनांक 20 डिसेंबर 2021 पर्यंत 3 लाख 44 हजार 944 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 269.98 कोटी पीक विमा जमा करण्यात आला आहे.उर्वरित पात्र सहा हजार 216 शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा वाटप करण्याची प्रक्रिया चालू असून लवकरात लवकर जमा होणार आहे.
- शासन निर्णय प्रपीवियो 2020/ प्र.क्र.40/11- अ दि. 29-06-2020 मधील मुद्दा क्रमांक 10.2 नुसार अधिसूचित केलेल्या पिक विमा क्षेत्रातील तुर या अधिसूचित पिकांसाठी संभाव्य नुकसानभरपाई ठरविण्यासाठी तूर पिकाचे एकूण संरक्षित क्षेत्राच्या पाच टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण करून शासन निर्णयातील मुद्दा क्र.10.2 नुसार जे महसूल मंडळ पात्र होतील त्या अधिसुचित महसूल मंडळांसाठी दिनांक 16 डिसेंबर 2021 रोजी काढलेल्या अधिसूचना लागू राहील.
- यामध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावर कोणत्याही कार्यालयात ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार देण्याची गरज नाही. असे आव्हान जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.
परभणी जिल्ह्याची स्थिती
खरीप हंगाम 2021-22 अंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये एकूण सहा लाख 34 हजार 531 शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे. त्यापैकी सोयाबीन पिकाची एकूण तीन लाख 1 हजार 676, कापूस पिकाचे 43 हजार 828, तूर पिकाचे एक लाख आठ हजार 571, मुग पिकाचे एक लाख 12 हजार 223, उडीद पिकाचे 40 हजार 882, खरीप ज्वारी पिकाचे 24 हजार 285 व बाजरी पिकाचे 3066 असे एकूण सहा लाख 34 हजार 531 शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे.
( संदर्भ- मी Eशेतकरी)
Share your comments