1. बातम्या

चक्क एक हजार कोथिंबिरीच्या जुड्यांचे मिळाले लाखो रुपये

आजपर्यंत आपण अनेक अश्या बातम्या ऐकल्या आहेत की अमुक शेतकऱ्याने तमुक पीक घेऊन हजारो लाखो रुपयांचे उत्पादन घेतले. तसेच मागच्या वर्षी सुद्धा एका शेतकऱ्याने कोथिंबीर पिकवून 12 लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Coriander

Coriander

आजपर्यंत आपण अनेक अश्या बातम्या ऐकल्या आहेत की अमुक शेतकऱ्याने तमुक पीक घेऊन हजारो लाखो रुपयांचे उत्पादन घेतले. तसेच मागच्या वर्षी सुद्धा एका शेतकऱ्याने कोथिंबीर पिकवून 12 लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे.

याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी या लॉक डाउन च्या काळात शेतीमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग करून लाखो रुपये कमावले आहेत. यामधीलच एक म्हणजे 1000 कोथिंबिरीच्या जुड्यांचे चक्क 67 हजार रुपये एवढे उत्पन्न मिळाले आहे.शेतकऱ्यांच्या कोथिंबीर या पिकाला भाव हा उन्हाळ्यात किंवा पावसाळ्याच्या सुरवातीला जास्त असतो. नाशिक मधील एका शेतकऱ्याला चक्क फक्त 1000 कोथिंबीरीच्या जुड्याचे चक्क 67 हजार रुपये मिळाले आहेत.

हेही वाचा:माझं मत - कर्जमाफी नका देऊ, पण फक्त हस्तक्षेप थांबवा

या आठवड्या मधील सर्वात जास्त दर हा कोथिंबीर ला मिळाला आहे. मार्केट  मधील  भाजीपाल्याची आवक  कमी  झाल्यामुले भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यामुळं कोथिंबीर ला या आठवड्यात उच्चांकी दर गाठला आहे.या आठवड्यात कोथिंबिरीच्या शेकडो पेंढ्याला 2400 ते 5400 एवढा भाव मिळाला आहे. परंतु शेवटी हाच भाव 6700 रुपये शेकडा या दराने कोथिंबीर विकली गेली. बदलत्या वातावरणामुळे तसेच रोगामुळे भाजीपाल्याची कमी आढळून आलेली आहे त्यामुळं भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

याचबरोबर कोरोना वायरस चा फैलाव कमी झाल्यामुळे आणि निर्बंध हटवल्यामुळे मोठी शहरे खुली झाली आहेत त्यामुळे भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि दरात सुद्धा खूप वाढ झालेली आहे.

English Summary: Got millions of rupees for one thousand Coriander Published on: 27 June 2021, 09:46 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters