1. बातम्या

गोसीखुर्द सिंचन प्रकल्प 2020 पर्यंत पूर्ण करणार

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
गोसीखुर्द सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक त्या परवानग्या घेऊन प्रकल्पाचे काम 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रालयात रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला.

मेट्रो मार्ग -2 बी, 3, 4, 4 ए, 5, 6 या मार्गाचे 119 किमीचे काम तसेच अतिरिक्त 169 किमी मार्गिकेचे काम 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वर्धा-नागपूर आणि अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरु करण्यात येईल. मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामांना गती देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मेट्रो मार्ग क्र. 7 अंधेरी-दहिसर हा मार्ग विकसित करण्यासाठी जमिनीचे हस्तांतरण करणे, तसेच मेट्रो मार्ग क्र. 4 वडाळा ते कासरवडवली विकसित करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.  

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो महामार्ग विकसित करण्यासाठी तंत्रनिकेतनची 5.76 हेक्टर जमीन तसेच ग्रामीण भागातील 4 हेक्टर आणि बालेवाडीतील 4 हेक्टर जमीन विकसित करण्यात येणार आहे. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण करण्यासाठी पीएमसीला जमीन हस्तांतरित करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग-3 कुलाबा ते बांद्रा, सीप्झ कॉरिडॉर, नागपूर मेट्रो, मोनोरेल, मेट्रो मार्ग 4 ए, मेट्रो मार्ग-6 समर्थ नगर ते विक्रोळी,  मेट्रो मार्ग-7 अंधेरी ते दहिसर, मेट्रो मार्ग-2 बी डी. एन नगर ते मंदाले, मेट्रो मार्ग क्र.2 ए दहिसर पूर्व ते डी.एन नगर तसेच भेंडीबाजार पुनर्विकास या विषयावर देखील बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, कृषी विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, 'म्हाडा'चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters