1. बातम्या

खुशखबर! PM KISAN योजनेचा पुढील हप्ता 'या' तारखेला खात्यात होणार जमा

केंद्र सरकार मार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. १ जानेवारी रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये पाठवले आहेत.

PM KISAN scheme

PM KISAN scheme

केंद्र सरकार मार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. १ जानेवारी रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये पाठवले आहेत. सरकार लवकरच 11 व्या हप्त्यासाठीचे पैसे जारी करणार आहे. 11व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही ताबडतोब रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

असे करा रजिस्ट्रेशन

1. सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जावे लागेल.
2. तेथे होमपेजवर तुम्हाला Farmers Corner असा पर्याय दिसेल.
3. येथे तुम्हाला 'New Farmer Registration' या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
5. यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.
6. फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
7. यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, ज्यांच्याकडे 2 हेक्टर म्हणजे 5 एकर लागवडीयोग्य शेती आहे त्यांनाच त्याचा लाभ मिळतो. आर्थिक वर्षात पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो.

English Summary: Good news! The next installment of PM KISAN scheme will be credited to the account on this date Published on: 04 February 2022, 02:33 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters