1. बातम्या

Ethanol Production : दिलासादायक बातमी! इथेनॉल निर्मिती बंदीचा निर्णय सरकारने घेतला मागे

ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉलची निर्मिती करण्यावर 7 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने बंदी घातली होती. देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय केंद्राकडून घेण्यात आल्याचे समजते. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत असल्याने अखेर हा निर्णय मागे घेत इथेनॉल निर्मितीसाठी सरकारने परवानगी दिली आहे.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
Ethanol Production News

महाराष्ट्रात साखर आणि इथेनॉलचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घेतले जात असून इथेनॉल निर्मिती बंद निर्णयाचा मोठा फटका कारखानदारांना बसणार होता. तसेच शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरावरही याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे या
निर्णयावर साखर कारखांनदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, १५ डिसेंबर रोजी मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय मागे घेण्यात आला असून इथेनॉलच्या निर्मितीसाठी सरकारने काही नियम व अटी लावले आहेत. उसाच्या रसापासून आणि मोलॅसिसपासून इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी सरकारने 17 लाख टन साखरेचा वापर करण्याची अट ठेवली आहे. 2023-24 मध्ये गळीत हंगाम उसाचा रस आणि बी-हेवी मळी वापरण्यास साखर कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे. आता सरकारने हा निर्णय मागे घेतल्याने ऊस ऊत्पादक शेतकरी आणि कारखानदारांना दिलासा मिळाला आहे.

English Summary: Good news! The government has taken back the decision to ban ethanol production Published on: 16 December 2023, 05:40 IST

Like this article?

Hey! I am भावना भालशंकर. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters