MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

आनंदाची बातमी : 'या' बाजार समितीत कांद्याला मिळतोय ३००० भाव; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

कांद्याच्या दरात नेहमी चढ-उतार होत असतो. कांद्याची आवक किती होती यावरून कांद्याच्या दारात नेहमी चढ-उतार जाणवतो. आता मागणीमुळे कांद्याच्या दरात पुन्हा सुधारणा झाली.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Onion

Onion

कांद्याच्या दरात नेहमी चढ-उतार होत असतो. कांद्याची आवक किती होती यावरून कांद्याच्या दारात नेहमी चढ-उतार जाणवतो. आता मागणीमुळे कांद्याच्या दरात पुन्हा सुधारणा झाली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३००० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

गेल्या आठवड्यात कांद्याच्या दरात किंचित घसरण झाली होती. पण या सप्ताहात मागणीतील स्थिरतेमुळे पुन्हा दरात काहीशी सुधारणा झाली. कांद्याची आवक स्थानिकसह बाहेरील जिल्ह्रयातून झाली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक रोज ५०० ते ६०० गाड्यांपर्यंत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. या सप्ताहातही आवकेचे प्रमाण तुलनेने चांगले राहिले.

सरासरी १७०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर कांद्याला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीठ यामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला आहे. यामुळे परिणामी उत्पन्न कमी झाले आहे.

English Summary: Good news: Onion is getting 3000 price in 'Yaa' market committee; An atmosphere of happiness among the farmers Published on: 08 February 2022, 10:36 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters