सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. शेतीमाला हाच शेतकऱ्यांचा आधार आहे. उत्पनाचे दुसरे साधन नाही. केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी फायद्याच्या योजना राबवण्यावर भर देत आहे. यामध्ये अल्पभूधारक शेतकरीच सरकारी योजनांच्या केंद्रस्थानी आहे.
शेती उत्पादन वाढीबरोबरच इतर माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकास व्हावा या दृष्टीने (PM Kisan Maandhan Yojana) पीएम किसान मानधन योजना ही सुरु करण्यात आली आहे. सध्या कोट्यावधी शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.
60 वर्षानंतर दर महिन्याला मिळणार पेन्शन
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन स्वरुपात मिळणार आहेत. म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये. सध्या शेती व्यवसयात बदल होत आहे. शिवाय उत्पादनात देखील वाढ होत आहे. पण शेतकऱ्यांना भरवश्याचे उत्पन्न असे काही नाही. त्यामुळे सरकारी नौकरदाराप्रमाणे त्यालाही पेन्शन मिळावी या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली आहे.
पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत पेन्शन मिळण्यासाठी शेतकऱ्याचे वय 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे. या योजनेत त्यांना दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागणार आहेत. यानंतरच शेतकऱ्यांना 60 वर्ष पूर्ण झाल्यावर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
योजनेसाठी असा करा अर्ज
1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला प्रथम त्याच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) जावे लागणार आहे.
2. तेथे सर्व कागदपत्रे सादर करून बँक खात्याची माहिती द्यावी लागणार आहे.
3. कॉमन सर्व्हिस सेंटर आधार कार्डला तुमच्या अर्जाशी जोडेल.
4. तुम्हाला किसान कार्ड पेन्शन अकाउंट नंबर दिला जाईल.
5. नंतर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजनेसाठी स्वत:ची नोंदणी करू शकता.
Share your comments