अहमदनगर : आपला शेतमाल विकण्यासाठी आधारभूत किंमतीने धान खरेदी केंद्राची यादी जाहीर करण्यात आली आहे. कृषी अधिकारी अहमदनगर यांनी त्यांच्याकडील 1 डिसेंबर, 2021 च्या पत्रान्वये खरीप पणन हंगाम 2021-22 मध्ये अकोले तालुक्यामधील पिक पेरणी अहवाल प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक, प्रादेशिक कार्यालय, जुन्नर यांच्या मागणीप्रमाणे सादर केलेला आहे. त्यानुसार धान या पिकाखालील खरीप हंगाम 2021-22 मधे अहमदनगर जिल्ह्याकरिता पिक पेरणी क्षेत्र 18 हजार 367 हेक्टर इतके आहे.
येथे होणार धान खरेदी
अकोले तालुका महामंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय राजुर, कोलटेंभे, हवीरर, तळे, कोहणे, सोमलवाडी आंघोळ गंभीरवाडी, सावरकुटे, देवगाव, पिंपरकणे, शेलविहिरे, धामणवन, शिरपुंजे, शेंबाळवाडी, हेंगाडवाडी,ठाकरवाडी, मान्हेरे,आंबेगव्हाण, आंबी, कुमशेत, पेनशेत, वारुंघुषी, ठाकरवाडी, अंबित, पाटीलवाडी, लाडगाव,टिटवी, वाकी, बुलडण, माणिक ओझर, कोठेवाडी, गोंदोषी, साकिरवाडी, आंबित, जानेवाडी, मुतखेल, बारवाडी, शिळवंडी, घोटी, पिंपरी, शेलद,
खडकी व तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील इतर धान लागवड असलेल्या सर्व महसूली गावांचा समावेश आहे.
शासन निर्णयानुसार धान खरेदी दर आधारभूत किंमत पुढीलप्रमाणे निश्चित केली आहे. धान/भात (एफएक्यू) एक साधारण आधारभूत किंमत 1 हजार 940 रुपये व "अ" दर्जा आधारभूत किंमत 1 हजार 960 रुपये. धान खरीप पणन हंगाम कालावधी 1 ऑक्टोबर 2021 ते 31 जानेवारी,2022 आहे. शासन निर्णयातील अटी व शर्ती याची काटेकोरपणे अंमलबजावणी संबधितांनी करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी आदेशित केले आहे. सर्व संबधितांनी याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे.
Share your comments