पुणे : यावर्षीचा समाधानकारक पाऊस, आणि लागवडीखालील वाढलेले क्षेत्र यामुळे यंदा खरिपाचे दमदार उत्पादन होणार असल्याचे कृषी मंत्रालयाच्या सुरुवातीच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. सरकारच्या अंदाजानुसार हे उत्पादन १४४.५ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. यावर्षीचे उत्पन्न मागच्या वर्षीच्या उत्पन्नापेक्षा दोन ते तीन दशलक्ष टनाने अधिक आहे.यावर्षीच्या वाढीव उत्तपन्नामध्ये डाळींचा मोठ्या प्रमाणात वाटा असणार आहे. यावर्षी डाळींचे उत्पादन मागच्या वर्षीच्या ७.७ दशलक्ष टनांवरून वाढून ९.३ दशलक्ष टन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावर्षी खरिपामध्ये धान्याचे उतपादन कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच भाताचे उत्पादन मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढून १०२.४ दशलक्ष टन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यांनतर तेलबियांचे उत्पादन मागच्या वर्षीच्या तुलनेत १५% ने वाढून २५.७ दशलक्ष टन होण्याचा अंदाज कृषी मंत्रालयाच्यावतीने वर्तवण्यात आला आहे. तेलबियामध्ये सर्वाधिक वाढ ही सोयाबीनची असणार आहे.यंदा देशात ताळेबंदीच्या पार्श्वभूमीवर फक्त कृषी क्षेत्राने सकारात्मक वाढ नोंदवली आहे. कृषी क्षेत्रातले मागणीमुळे अर्थव्यवस्थेला थोडी चालना मिळाली आहे.
Share your comments