केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 2.5 कोटी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खत, बियाणांसाठी कर्ज सहज उपलब्ध होते. यावर लागणारे व्याजही गतिशील असते. म्हणजे, जर कर्ज घेणारे शेतकरी वेळेवर कर्ज परत करतात त्यांच्याकडून कमी व्याज घेतले जाते.
शेतकरी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही 1.60 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विना गॅरंटी घेऊ शकतात. या कार्डवर शेतकरी तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. आतापर्यंत 1.5 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले आहे. आता भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने किसान क्रेडिट कार्डविषयी सविस्तर माहिती जाहीर केली आहे.
केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया पहिल्यापेक्षा सोपी केली आहे. यासाठी लागणारी प्रक्रिया शुल्क रद्द करण्यात आले आहे. बँकांना गावांगावामध्ये कँम्प लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आणि केसीसी स्कीमला लिंक केल्यानंतर देशातील 1.5 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बँका शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यास मनाई करू शकत नाहीत.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्डची वैशिष्ट्ये
-
किसान क्रेडिट कार्डच्या खात्यातील क्रेडिट रकमेवर सेव्हिंग्ज खात्याच्या दराने व्याज दिले जाते.
-
केसीसी धारकांना मोफत एटीएम आणि डेबिट कार्ड ( स्टेट बँक किसान कार्ड) दिले जाईल.
-
3 लाख रुपयांच्या कर्जाला 2 टक्के व्याजदरात सूट
-
वेळेत कर्ज परतफेड केल्यास 3 टक्के व्याजदरात सूट
-
1.60 लाखांपर्यंत विनातारण कर्ज
-
किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज अनूसूचित केलेले पीक, पीक विमा असणाऱ्या पिकांना दिले जाते.
-
पहिल्या वर्षातील कर्जासाठी उत्पादन खर्च आणि पीक काढणीच्या खर्चावर आधारित कर्ज दिले जाते.
-
5 वर्षांतील आर्थिक व्यवहार पाहून कर्ज रक्कम निर्धारितकेली जाते.
-
1.60 लाखापर्यंतचं कर्ज विनातारण दिले जाते.
-
परतफेड कालावधी संपल्यानंतर चक्रवाढ पद्धतीनं व्याज आकारले जाते.
आवश्यक कागदपत्रे
-
विहीत नमुन्यातील अर्ज
-
ओळखपत्र म्हणून मतदार कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स
-
शेतकरी
-
खंडानं जमीन करणारे शेती गट
Share your comments