1. बातम्या

ये हुई ना बात! भारतात लवकरच लॉन्च होणार ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर, शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट- परिवहन मंत्री नितिन गडकरी

भारतात पेट्रोल डिझेलच्या अवाजवी किमतीमुळे वाहनासाठी खर्च हा खुप वाढला आहे, त्यामुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढताना दिसत आहे. आतापर्यंत भारतात इलेक्ट्रिक बाइक, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक मिनी बसेस, इलेक्ट्रिक मिनी ट्रक लॉन्च झाले आहेत, पण आता भारतात ऑल इलेक्ट्रिक होणार असे आसार दिसत आहेत. याची माहिती स्वतः भारताचे केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी दिली. गडकरी यांच्या मते, येणाऱ्या काही दिवसात एक बॅटरी ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च करणार यामुळे कृषी क्षेत्रात एक मोठी क्रांती घडून येईल आणि शेतकऱ्यांना उत्पन्नात दुपटीने फायदा होईल तसेच शेतीसाठी येणारा खर्च हा देखील यामुळे आटोक्यात येईल, एकंदरीत या बॅटरी ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्याचे आयुष्य सुजलाम सुफलाम होण्याच्या मार्गावर असेल.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
nitin gadkari

या बॅटरी चलित इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना जमिनीची मशागत करण्यासाठी तसेच आपला शेतमाल बाजारापर्यंत नेण्यासाठी कमी खर्च येईल याचा सरळ परिणाम हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर दिसून येईल यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांची कमाई ही डबल होणार आहे. मात्र माननीय मंत्री महोदय यांनी यावेळी कोणती कंपनी हे बॅटरी चलित ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च करणार आहे याची माहिती देण्यास नकार दर्शविला, असे असले तरी मंत्रीमहोदयांनी ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर हे लॉन्च करायला आता फक्त काही औपचारिकता बाकी आहे हे नमूद केले. जमिनीची मशागत करण्यासाठी बॅटरी चलीत ट्रॅक्टरला अधिक ऊर्जेची आवश्यकता पडेल, त्यामुळे बॅटरी चलित ट्रॅक्टर मशागतीसाठी वापरले जाऊ शकते की नाही यावर अजून तरी प्रश्नचिन्ह आहे. मात्र माननीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले होते की ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर द्वारे शेतमाल हा बाजारापर्यंत नेला जाऊ शकतो. मागच्या आठवड्यात माननीय मंत्री एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स इवी समिटला हजर होते, यावेळी त्यांनी संप मिटला संबोधन देखील केले, मंत्री महोदय यांनी सांगितलं की, "एका शेतकऱ्याला बाजार समितीत शेतमाल घेऊन जाण्यासाठी एका ट्रीपला ऍव्हरेज 200 रुपयांचा खर्च लागतो, त्यामुळे येत्या काही दिवसात बाजारात एक दमदार ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च करणार."

सोनालिका ने लॉन्च केलंय इलेक्ट्रिक ट्रॅक्टर- देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतीनी आभाळाला गवसणी घातली आहे, राज्यात डिझेलची किंमत ही शंभरच्या पार झाली आहे, पेट्रोल तर 110 रुपये लिटरने विक्री होत आहे, त्यामुळे मागच्या काही महिन्यात शेतीसाठी लागणारा खर्च हा दुपटीने वाढला आहे. त्यामुळे ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक बनत चालले आहे. पंजाब राज्यात स्थित सोनालिका ट्रॅक्टर्स देशातील एकमेव अशी ट्रॅक्टर कंपनी आहे जिने व्यावसायिक दृष्ट्या बाजारात एक ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉंच केले आहे. सोनालिका च्या ट्रॅक्टर ला टायगर इलेक्ट्रिक म्हणून संबोधले जाते सोनालिका कंपनीने या ट्रॅक्टरला 2020 मध्ये लॉन्च केले होते.

द हिंदू बिझनेस नुसार, अकरा किलोवाट मोटरद्वारे चालणाऱ्या या 500 किलोग्रॅम वजनाच्या टायगर ट्रॅक्टरद्वारे शेतीची अनेक कामे केली जाऊ शकतात जसे की, ब्लोअर जोडला जाऊ शकतो, गवत कापले जाऊ शकते, रोटर मारता येऊ शकते, तसेच ट्रॉली जोडून शेतमाल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जाऊ शकतो. सोनालिका कंपनी च्या वाटेवर महिंद्रा अँड महिंद्रा देखील लवकरच चालणार असे संकेत व्यक्त केले जात आहेत, वर्ष 2026 पर्यंत महिंद्रा आपल्या स्वतःच्या महिंद्रा ब्रँड अंतर्गत तसेच स्वराज ब्रँड च्या अंतर्गत ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च करणार असे सांगितले जात आहे. तसेच एस्कॉर्ट्स व टॅफे या कंपन्या देखील लवकरच ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च करणार आहेत.

English Summary: good news in india electric tractor will launch soon said by central minister gadkari Published on: 18 December 2021, 11:39 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters