सर्वसामान्य लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता गॅस (gas) 300 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. तुम्ही आता सहज स्वस्तात गॅस सिलिंडर बुक करू शकणार आहात. फक्त 750 रुपयांमध्ये सिलिंडर कसा मिळेल याविषयी आपण माहिती जाणून घेऊया..
इंडेनकडून खास सुविधा
इंडेन (Inden) या सरकारी तेल कंपनीने सर्वसामान्यांसाठी एक खास सुविधा सुरु केली आहे. इंडेनच्या या सुविधेअंतर्गत फक्त 750 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर (Gas Cylinder) मिळणार आहे.
इंडेनने ग्राहकांसाठी कंपोझिट सिलिंडरची सुविधा सुरु केली आहे. हा सिलिंडर घेण्यासाठी आता तुम्हाला फक्त 750 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या सिलिंडरचे (Cylinder) वैशिष्ट्य म्हणजे, ते तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गॅस सहजपणे ट्रान्सफर (transfar) करु शकता.
नितीन गडकरींनी शेतकऱ्यांना दिला मोलाचा सल्ला; म्हणाले...
सध्या देशभरात गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. दिल्लीत 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 1053 रुपये आहे. अशा परिस्थितीत सरकारी कंपनी इंडेनकडून तुम्हाला 750 रुपयांना सिलिंडर दिला जात आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सोयाबीनच्या दरात सुधारणा; मिळतोय 'इतका' दर
या सर्व शहरांमध्ये सिलिंडर उपलब्ध होणार
कंपोझिट सिलेंडर (Composite cylinder) वजनाने बाकी सिलिंडर पेक्षा हलके असतात. या सिलिंडरमध्ये 10 किलो गॅस (gas) मिळतो. या कारणाने या सिलिंडरची किंमत कमी आहे. सध्या हे सिलिंडर 28 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे कंपनी लवकरच सर्व शहरांमध्ये हे सिलिंडर उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे इंडेन कंपनीची ही सुविधा सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सूक्ष्म सिंचनासाठी तब्बल 666 कोटींचे अनुदान जाहीर
LIC च्या जीवन प्रगती योजनेमध्ये दररोज 200 रुपये जमा करा आणि मॅच्युरिटीनंतर मिळवा 28 लाख रुपये
आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान ठरण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Share your comments