OBC आणि EWS मधील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ओबीसी आणि ईडब्लूएस प्रवर्गातील सर्व मुलींची संपूर्ण फी राज्य सरकारच भरणार आहे. मराठा उपसमितीच्या बैठकित महत्वाचा निर्णय झाला. आठ लाखांपेक्षा कमी वर्षीक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान हा निर्णय पुढे राज्यमंत्री मंडळाकडे पाठवणार असल्याची माहिती मराठा उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
आतापर्यंत एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची फी सरकारतर्फे भरण्यात येत होती. पण आता ओबीसी आणि ईडब्लूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांची फि देखील सरकार भरणार आहे.मराठा आरक्षण उप समितीच्या झालेल्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला असून लवकरच तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर राज्यातील ओबीसी आणि इडब्ल्यूएसमधील लाखो मुलींना याचा लाभ होणार आहे
नांदेडमधील एका विद्यार्थिनीने फी भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर ही बाब सरकारच्या निर्दशनास आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत सूचना दिल्या आहेत. दरम्यान 642 कोर्सेससाठी एक हजार कोटीची नव्याने तरतूद देखील करण्यात येणार आहे.
Share your comments