शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे म्हणून राज्य सरकार तसेच केंद्र सरकार नेहमी प्रयत्न करत असते. जे की शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करावे यासाठी सरकार अनुदान ही आणत असते. आता जांभूळ उत्पादकांना सुद्धा अनुदान दिले गेले आहे. पालघर मधील जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना आता झाडावरचे जांभूळ काढण्यासाठी जो खर्च येणार आहे त्यासाठी सुद्धा अनुदान भेटणार आहे. पालघर तालुक्यातील बहाडोली गाव जांभूळ फळासाठी प्रसिद्ध आहे. झाडावरील जांभूळ काढण्यासाठी जे परांची तयार करावी लागते त्यासाठी खूप खर्च लागतो त्यामुळे तेथील जांभूळ उत्पादक शेतकरी अडचणीत येतात. शासनाकडून कोणती मदत मिळेल का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागते होते जे की हे लक्ष पूर्ण झाले असून १० लाख रुपयांच्या निधी ची तरतूद सुद्धा झालेली आहे.
कशा पध्दतीने बनते परांची?
झाडावरचे जांभूळ काढण्यासाठी जी परांची बनवली जाते त्यासाठी बांबू बनवले जातात. झाडांवरचे जांभूळ काढण्यासाठी परांची तयार केली जाते जे की त्या परांची वर चढून जांभूळ काढता येते. मोठ्या जांभळाच्या झाडाला १०० बांबू ची परांची तर लहान जांभळाच्या झाडाला ७० बांबू ची परांची लागते. हे बांबू बांधण्यासाठी रस्सी ची गरजही लागते जे की या सर्वांना २० हजार रुपये पर्यंत खर्च जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना परांसाठी अनुदान मिळावे अशी अपेक्षा सरकारकडे होती जे की या मागणीला सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना घाबरायचे कारण नाही.
एकाच गावात 6 हजार जांभळाची झाडे :-
बहाडोली गावातील जांभळाची चव खूप छान आहे त्यामुळे या गावातील जांभूळ राज्यात प्रसिद्ध झाले आहे. मार्च महिन्यात जांभळ येते. एकट्या बहाडोली गावात ६ हजार जांभळाची झाडे आहेत जे की या गावातील पोषक वातावरणामुळे येथे जांभळाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात येते आणि उत्पादन मोठे असल्यामुळे परांची गरज लागते आणि परांची बनवण्यासाठी बांबू ची गरज लागते. परांची बनवण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी होत्या आणि त्यासाठी १० लाखाचा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तरतूद केलेला आहे असे जिल्हा परिषद सदस्या नीता पाटील यांचे मत आहे.
चक्रीवादळात झाले होते मोठे नुकसान :-
सततच्या वातावरणात झालेल्या बदलामुळे पिके तसेच फळबागांवर परिणाम झालेला आहे. जांभूळ उत्पादकांचे सुद्धा याचप्रमाणे नुकसान झाले आहे जे की या वादळामुळे उत्पादनाला धोका आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की परांचीसाठी तरी अनुदान मिळावे. जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांची ही अवस्था बघून १० लाख रुपयांचे अनुदान दिले आहे.
Share your comments