यावर्षी खरीप हंगामातील जवळजवळ सगळ्याच पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला. परंतु खरीप हंगामातील शेवटचे पीक म्हणून ओळखले जाणारे तूर एक बर्यापैकी शेतकऱ्यांच्या हातात आले.
परंतु या तुरीची खरेदी हमीभावापेक्षा ही बाजारात कमी दराने होत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले होते. याच पार्श्वभूमीवर नाफेडच्या वतीने हमीभाव केंद्राची सुरुवात करण्यात आली असून त्यामुळे आता तुर पिकाला योग्य दर मिळणार आहे.
तूर पिकासाठी शासनाने सहा हजार तीनशे रुपये हमीभाव ठरवलेला आहे. मात्र तुरीची आवक बाजारात सुरू झाल्यानंतर व्यापाऱ्यांकडून त्यापेक्षा कमी दराने खरेदी सुरू होती आणि शेतकऱ्यांकडे पर्यंत शिवाय दुसरा पर्याय नसल्याने शेतकऱ्यांना कमी भावात तूर विकावी लागत होती.
या पार्श्वभूमीवर हमीभाव केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने आता अनुभव केंद्र सुरू करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे
तसे पाहायला गेले तर तूर पिकाचे खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांची होती. परंतु ही सगळी केंद्र प्रक्रियेत अडकल्यामुळे त्यांना विलंब लागत होता. अखेर सोमवारपासून केंद्र सुरू होत असल्याचे नॅशनल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन च्या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक एस. के. सिंग यांनी सांगितले.
नाफेड च्या वतीने तुरीचा प्रतिक्विंटल दर हा सहा हजार तीनशे रुपये ठरवलेला आहे. आणि व्यापाऱ्यांकडून बाजारात 5900 रुपयांनी तूर खरेदी केली जात होती. म्हणजेच क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपये शेतक-यांचे नुकसान होते. शासनाच्या या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना आधार मिळून होणारे नुकसान टळणार आहे.
शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर जाण्याअगोदर यासाठी आपल्या मालाचे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा उतारा, बँक खाते पासबुक झेरॉक्स, 8 अ उतारा इत्यादी कागदपत्रे विक्री पूर्वी नोंदणीसाठी बंधनकारक आहेत.
Share your comments