7th Pay Commission: कोरोनाच्या संकटामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुन्या दरानेच महागाई भत्ता मिळत आहे. सध्या हा दर 21 टक्के आहे, पण 17 टक्क्याच्या दराने हा भत्ता दिला जात आहे. कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्तीवेतनधारकांनाही हाच दर लागू आहे.
1 जानेवारी या तारखेपासून लागू होणार होते वाढीव दर
गेल्यावर्षी 1 जानेवारीपासून वाढीव दराने डीए दिले जाणे अपेक्षित होते. कोरोनाच्या संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. कमी डीए मिळत असल्याने सध्या याचा थेट परिणाम लाखो कर्मचाऱ्यांचा पगार आणि निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनावर होत आहे.
होळीच्या निमित्ताने सरकार घेणार महत्वाचा निर्णय
50 लाख कर्मचारी आणि तितकेच निवृत्तीवेतनधारक याबाबतीत दिलासा मिळण्याची आशा लावून आहेत. आता हाती येत असलेल्या बातम्यांनुसार सरकार होळीच्या निमित्ताने याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जर हा निर्णय सकारात्मक असेल तर केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबरच निवृत्तीवेतनधारकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
अर्थमंत्रालयाने यासंदर्भात एक महत्वाची माहिती दिली आहे. या माहितीनुसार लाभार्थींना पूर्ण डीए म्हणजेच महागाई भत्ता देण्यास 1 जुलैपासून सुरुवात होणार आहे. डीएच्या बाकी असलेल्या तीन हफ्त्यांचे भुगतान 1 जुलै 2021पासून चालू होणार आहे. तसेच सरकारने नुकताच कुटुंब निवृत्तीवेतनात अडीच पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची मर्यादा 45 हजार रुपयांवरून वाढवून 1.25 लाख रुपये प्रति महिना करण्यात आली आहे.
Share your comments