यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठे नुकसान सहन करावे लागले होते त्यामुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाच्या पिकांवर अवलंबित्व वाढले होते. पण रब्बी हंगामाची पिके भूमी बाहेर पडण्याआधीच त्यावर निसर्गाची अवकृपा जाणवायला लागली होती. रब्बी हंगामातील पेरणी ही अवकाळी पावसामुळे चांगलीच लांबली होती कशीबशी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची पेरणी आपटली पण त्यावर अवकाळी पावसानंतर तयार झालेल्या वातावरणाचा वाईट परिणाम जाणवायला लागला होता. खरीप हंगामात झालेले नुकसान भरपाई शेतकरी रब्बी हंगामातुन काढण्याच्या विचारात होता पण त्याच्या या आशेवर अवकाळी ने पूर्णतः पाणी फेरले होते. संपूर्ण राज्यात अवकाळी ने त्राहिमाम् माजवला होता, मराठवाड्यात या अवकाळी ने रब्बी हंगामाची पुरती लावून टाकली होती.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात रब्बी हंगामात दुबार पेरणी करावी लागली होती,मात्र आता मराठवाड्यात समावेत राज्यात गुलाबी थंडी चांगलीच जोर पकडू लागली आहे त्यामुळे पिके चांगलीच बहरत आहेत. नांदेड जिल्ह्यात देखील आता पिके चांगली बहरू लागले आहेत. त्याच्या पंधरवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे व थंडी देखील चांगली पडत आहे त्यामुळे पिकांना पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील हरभरा ज्वारी गहू ही पिके चांगली बहरू लागले आहेत. रब्बी हंगामातील पेरणीनंतर शेतकऱ्यांचा जीव अवकाळी पावसामुळे पुरता उडाला होता, पण आता हवामान हे स्वच्छ झाले असून येत्या काही दिवसात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे, शिवाय थंडीचे प्रमाण देखील वाढले आहे त्यामुळे शेतकरी थोडा का होईना सुखावला आहे.
हरभऱ्या साठी तयार झाले पोषक वातावरण- रब्बी हंगामातील पिकांना अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला होता, पिके उगवण्यापूर्वीच त्यांच्यावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत होता. हरभरा पिकावर देखील घाटेअळी व मर रोगाचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवत होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात असा संभ्रम निर्माण झाला होता की, खरीप हंगामा प्रमाणेच रब्बी हंगामदेखील निसर्गाच्या अवकृपेमुळे हातचा निघून जाईल. पण आता वातावरणात पूर्णतः बदल झाला आहे, थंडीमध्ये कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे
त्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा समवेत इतर पिके देखील बहरू लागली आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात चांगले उत्पन्न प्राप्त होईल अशी आशा आता शेतकरी बांधवांना वाटू लागली आहे. तसेच कृषी वैज्ञानिक आम्ही सल्ला दिला आहे की हरभरा पिकावर अजूनही मर रोग जाणवत असेल तर निंबोळी अर्काची फवारणी शेतकऱ्यांनी करावी, हे करून देखील मर रोग आटोक्यात आला नाही तरच रासायनिक फवारणी कडे वळावे असा सल्ला कृषी वैज्ञानिकांनी यावेळी दिला.
Share your comments