1. बातम्या

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना केंद्र सरकार देणार गोड बातमी! आज या पिकांची किमान आधारभूत किंमत वाढणार

देशात खरीप पिकांची काढणी शेवटच्या टप्प्यात आली आहे. लवकरच रब्बी हंगामाची पेरणी सुरु होणार आहे. त्याआधी शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार असलयाचे दिसत आहे. केंद्र सरकार आज रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत वाढवणार असल्याची माहिती मिळत आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
MSP

MSP

देशात खरीप पिकांची (Kharip Crop) काढणी शेवटच्या टप्प्यात आली आहे. लवकरच रब्बी हंगामाची (Rabi Season) पेरणी सुरु होणार आहे. त्याआधी शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार असलयाचे दिसत आहे. केंद्र सरकार (Central Govt) आज रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवणार असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांची खरीप पिके पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. दिवाळीपूर्वी सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

रब्बी पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. खरं तर, केंद्र सरकार मंगळवारी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्यास मंजुरी देऊ शकते. यासाठी आज केंद्रीय मंत्रिमंडळ आणि सीसीईए यांच्यात बैठक होणार आहे.

देशात लम्पीचा कहर! ७० हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू; जाणून घ्या मृत्यूदर वाढतोय की कमी होतोय...

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत रब्बी पिकांच्या (Rabi Crop) एमएसपीवर मोठा निर्णय होऊ शकतो. रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये ९ टक्क्यांनी वाढ केली जाऊ शकते. विशेष म्हणजे डाळींचे भाव सर्वाधिक वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या वृत्तामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लोक एमएसपी वाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

जून महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022-23 पीक वर्षासाठी धानाचा एमएसपी 100 रुपयांनी वाढवून 2,040 रुपये प्रति क्विंटल केला होता. त्याचप्रमाणे इतर अनेक खरीप पिकांवरही एमएसपी वाढवण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

14 खरीप पिकांच्या 17 वाणांसाठी नवीन एमएसपी मंजूर करण्यात आला

खरेतर, तेव्हाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 खरीप पिकांच्या 17 वाणांच्या नवीन एमएसपीला मंजुरी देण्यात आली होती. तिळाच्या एमएसपीमध्ये 523 रुपयांनी, तूर आणि उडीद डाळीच्या एमएसपीमध्ये 300 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

धानाचा एमएसपी (सर्वसाधारण) 1,940 रुपये प्रति क्विंटलवरून 2,040 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत एमएसपीचे बजेट 1 लाख 26 हजार इतके वाढले होते.

महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग! अनेक ठिकाणी धो धो कोसळला, आजही अतिवृष्टीचा इशारा

ज्वारीचा एमएसपी 1600 रुपये प्रति क्विंटलवरून 1635 रुपये झाला

त्याचबरोबर गेल्या वर्षीही केंद्र सरकारने रब्बी हंगामातील सहा पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली होती. सर्वाधिक वाढ मोहरी आणि मसूरच्या दरात ४०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल झाली. तर एमएसपीमध्ये सर्वात कमी वाढ जवारीत झाली.

सरकारने गहू, ज्वारी, हरभरा, मसूर, मोहरी आणि सूर्यफूल या पिकांच्या शासकीय खरेदी दरात वाढ केली होती. ज्वारीचा एमएसपी 1600 रुपये प्रति क्विंटलवरून 1635 रुपये करण्यात आला आहे.

त्याचबरोबर हरभऱ्याच्या एमएसपीमध्ये 130 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर त्याचा भाव 5230 रुपये प्रतिक्विंटल ठरवण्यात आला. मसूरच्या एमएसपीमध्ये 400 रुपयांनी, मोहरीच्या 400 रुपयांनी आणि सूर्यफुलाच्या 114 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महत्वाच्या बातम्या:
कच्च्या तेलाच्या घसरल्या! आज पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले का? जाणून घ्या...
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदी स्वस्त! 10 ग्रॅम सोने 29502 रुपयांना; पहा नवे दर...

English Summary: Good news for farmers before Diwali! Today the MSP of these crops will increase Published on: 18 October 2022, 12:43 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters